शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दिवाळी : राजस्थानात फटाक्यांची विक्री अन् आतिशबाजीवर बंदी, गेहलोत सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 09:23 IST

फटाके विक्रीच्या अस्थायी लायसन्सलाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय लग्न तसेच इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये, असेही गेहलोत म्हणाले.

ठळक मुद्देराजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे....दिवाळीत लोकांनी आतिशबाजी करू नये - गेहलोतलग्न तसेच इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये - गेहलोत

जयपूर -राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी, फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोना संक्रमितांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर फिटनेस शिवाय धूर सोडणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश गेहलोत सरकारने दिले आहेत. 

मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, कोरोना महामारीच्या या आव्हानात्मक काळात राज्यातील नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे. आतिशबाजीतून निर्माण होणाऱ्या  धुरामुळे कोरोनाबाधितांबरोबरच हृदय आणि श्वासनाची समस्या असणाऱ्या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागतो, यामुळे, दिवाळीत लोकांनी आतिशबाजी करू नये. एवढेच नाही, तर त्यांनी फटाके विक्रीच्या अस्थायी लायसन्सलाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय लग्न तसेच इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये, असेही गेहलोत म्हणाले.

गेहलोत यांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवास स्थानी राज्यातील कोरोना स्थितीचा आणि ‘नो मास्क-नो एंट्री’ आणि ‘शुद्धतेसाठी युद्ध’ अभियानाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनलॉक-6च्या गाईडलाइंसवरही चर्चा केली. तसेच काही दिशा-निर्देशही दिले.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेनसारख्या विकसित देशांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. अनेक देशांना तर पुन्हा लॉकडाउनची घोषणा करावी लागली आहे. आपल्याकडेही अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आपणही सावधगिरी बाळगायला हवी.

ड्रायव्हर्सना आवाहन -मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वाहन चालकांना आवाहन केले आहे, की त्यांनी सिग्नलवर लाल लाईट लागताच वाहने बंद करावीत. तसेच, प्रदूषणाच्या  मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. एखाद्या वाहनाचे फिटनेस असतानाही ते प्रमाणापेक्षा अधिक धूर सोडताना दिसल्यास, संबंधित फिटनेस सेंटरवरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही गेहलोत यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसDivaliदिवाळीCrackersफटाके