'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:55 IST2025-06-07T17:52:56+5:302025-06-07T17:55:24+5:30

Class 10 Student Suicide News: आईने टीव्ही पाहण्यापासून रोखले म्हणून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

Class 10 student in himachal pradesh dies by suicide after mother scolds him over studies | 'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

आईने टीव्ही पाहण्यापासून रोखले म्हणून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील पानोह गावात गुरुवारी दुपारी घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा दहावीचा विद्यार्थी होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी आईने त्याला टीव्ही बंद करून अभ्यास करायला सांगितले. मात्र, त्यामुळे नाराज तो नाराज झाला आणि घराबाहेर पडला. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने घरच्यांनी त्याला शोधायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा मतदेह घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या जुन्या रिकाम्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. मयताच्या कुटुंबातील सदस्यांच्या जबाबांनुसार, याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली, अशी माहिती घुमारवीचे पोलिस उपअधीक्षक चंद्रपाल सिंह दिली.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा
भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. त्यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील थोर आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील. 

Web Title: Class 10 student in himachal pradesh dies by suicide after mother scolds him over studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.