शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

“सामान्यांचे म्हणणे सुप्रीम कोर्ट ऐकत नाही”; वकिलांचा आरोप, CJI चंद्रचूड यांनी चांगले झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:46 IST

Supreme Court CJI DY Chandrachud: एका वकिलांनी सुप्रीम कोर्टाला ईमेल करत काही आरोप केले होते. या आरोपांवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

Supreme Court CJI DY Chandrachud: आताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयात अनेक महत्त्वाच्या विषयांवरील याचिकांवर सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष असेल, मणिपूर हिंसाचार असेल किंवा अनुच्छेद ३७० संदर्भातील याचिका असेल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ याचिकांची सुनावणी करत आहे. यातच जम्मू-काश्मीरसंदर्भातील अनुच्छेद ३७० वरील याचिकेवर सुनावणी सुरू असताना एका वकिलांनी मोठा आरोप केला. सामान्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यालालय ऐकून घेत नाही. सामान्यांची गाऱ्हाणी ऐकली जात नाहीत. केवळ आवडीच्या याचिकांवर घटनापीठ सुनावणी घेते, असा दावा वकिलांनी केला. यावर सरन्यायाधीश चंद्रचडू यांनी कडक शब्दांत वकिलांना सुनावले. 

मिळालेल्या माहितीनुसार, विधिज्ञ मॅथ्यूज नेदुम्पारा यांनी सर्वोच्च न्यायालयाला एक ईमेल केला होता. या ईमेलमध्ये, नेदुम्पारा यांनी दावा केला होता की, सर्वोच्च न्यायालय केवळ घटनापीठ प्रकरणांची सुनावणी करत आहे. घटनापीठांकडून होणाऱ्या सुनावण्यांमध्ये कोणतेही सार्वजनिक हिताची प्रकरणे नाही. ते सामान्य नागरिकांच्या प्रकरणांची सुनावणी करत नाही. नेदुम्पारा म्हणाले की, डिजिटल पद्धतीने सुनावणी सक्षम करण्याचे चांगले काम केल्याबद्दल न्यायालयाला धन्यवाद देतो. याचा वकील आणि याचिकाकर्त्यांना खूप फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले.

होय, सर्वोच्च न्यायालयाला ईमेल केला होता

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, श्रीमान नेदुम्पारा यांनी केलेल्या दाव्यांबाबत काही टिप्पणी करायची नाही. सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या ईमेलबद्दल महासचिवांनी मला कळवले आहे, असे खंडपीठाने निदर्शनास आणून दिले. न्यायालयाच्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाला ईमेल केल्याचे नेदुम्पारा यांनी कबूल केले. तसेच सदर दावे केल्याचे मान्य केले. यावर, तुम्ही ही बाब डोक्यातून काढून टाका. मला फक्त हे सांगायचे आहे की, तुम्हाला संविधान खंडपीठाची प्रकरणे काय आहेत हे माहिती नाही आणि घटनापीठासमोरील प्रकरणांचे महत्त्व माहिती नाही असे दिसते. अशा याचिकांमध्ये अनेकदा संविधानातील तरतुदींचा अर्थ लावला जातो. यामुळे भारतातील कायदेशीर चौकट आकाराला येते. तुम्ही अनुच्छेद ३७० बद्दल विचार करू शकता की, हा मुद्दा प्रासंगिक नाही. मात्र, मला वाटत नाही की, सरकार किंवा याचिकाकर्त्यांना असे वाटते. अनुच्छेद ३७० प्रकरणी आम्ही काश्मीर खोऱ्यातून आलेल्या व्यक्ती आणि हस्तक्षेप करणाऱ्यांचे गट ऐकले.  त्यांनी त्यांची मते आमच्यासमोर मांडली. त्यामुळे आपण राष्ट्राचा आवाज ऐकत आहोत, असे सीजेआय डीवाय चंद्रचूड यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार्‍या घटनेतील अनुच्छेद ३७० मधील बहुतांश तरतुदी रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल राखून ठेवला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या याचिकांसाठी विधिज्ञ नेदुम्पारा युक्तिवाद केला होता. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर