शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"माफ करा, मला उशीर झाला...", फक्त 10 मिनिटे विलंबाबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये मागितली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 09:05 IST

ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : "माफ करा, मला उशीर झाला...", असे म्हणत ज्या व्यक्तीने माफी मागितली आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आहेत. कोर्ट रुममध्ये फक्त 10 मिनिटे उशिरा पोहोचल्यावर धनंजय चंद्रचूड यांनी हे मोठे मन दाखवून दिले आहे. दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे अत्यंत वक्तशीर आहेत आणि त्याचे पालन करून ते इतर न्यायाधीश आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या कर्तव्याचा मोठा संदेश देत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचे म्हटले जात आहे. द वीकमधील (The Week) वृत्तानुसार, एक दिवस सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना कोर्टरूममध्ये पोहोचण्यास 10 मिनिटे उशीर झाला. त्यानंतर जेव्हा ते कोर्टरुमध्ये आले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांची माफी मागितली, असे सांगितले जात आहे. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, "माफ करा, मी सहकारी न्यायमूर्तींसोबत काहीतरी चर्चा करत होतो... त्यामुळे उशीर झाला." दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी इतक्या विलंबाबद्दल माफी मागणे काही सामान्य गोष्ट नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार सिंह यांनी एका मीडिया ग्रुपला दिलेल्या निवेदनात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची आठवण करून दिली आणि सांगितले की, ते खूप शिस्तप्रिय आहेत आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात. इतरांनी वेळेची पूर्ण काळजी घेऊन न्यायालयात पोहोचावे अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे इतर सहकारी न्यायाधीशही सुद्धा म्हणतात की, ते सत्य सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि हसतमुख सत्य सांगतात. त्यांची ही खासियत त्यांना सर्वात वेगळी आणि अत्यंत साधी-साधी मनाची व्यक्ती बनवते.

दरम्यान, धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत. मागील काही काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे नाव वारंवार चर्चेत आले आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या रोखठोक व मिश्कील अशा दोन्ही बाजू सर्वसामान्यांनादेखील भावल्या आहेत. अलीकडेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीशांच्या कामांचा आणि सुट्ट्यांचा हिशेब मांडला होता. न्यायाधीश वर्षातले 200 दिवस न्यायालयात काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, कायदे आणि नियम हेच सगळे सुरू असते, असेही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय