CAA Protest Live Updates: लोकशाहीच्या हक्कासाठी लोकांनी आवाज उचलायला हवा - फरहान अख्तर

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 03:32 PM2019-12-19T15:32:48+5:302019-12-19T19:44:26+5:30

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळून आला आहे. डावे आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली ...

Citizenship Amendment Act Live Updates: Protest against CAA in Delhi, West Bengal, Uttar Pradesh | CAA Protest Live Updates: लोकशाहीच्या हक्कासाठी लोकांनी आवाज उचलायला हवा - फरहान अख्तर

CAA Protest Live Updates: लोकशाहीच्या हक्कासाठी लोकांनी आवाज उचलायला हवा - फरहान अख्तर

Next

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळून आला आहे. डावे आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. याचा प्रभाव उत्तर प्रदेश, बिहारपासून ते बंगळुरूपर्यंत पाहायला मिळतोय. डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी समर्थन दिलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दिल्लीतील 14 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.

LIVE

Get Latest Updates

07:43 PM

लोकशाहीच्या हक्कासाठी लोकांनी आवाज उचलला पाहिजे - फरहान अख्तर

07:42 PM

अहमदाबादमध्येही आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची केली तोडफोड

07:41 PM

CAA आणि NRC बाबत संभ्रम दूर करण्यासाठी केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण

06:03 PM

३४ गाड्या तर ४ मीडिया ओबी व्हॅनला आंदोलकांनी केलं लक्ष्य

लखनौ येथील आंदोलनात जमावाने २० मोटारसायकल, १० गाड्या, ३ बसेस, ४ मीडिया ओबी व्हॅन यांची जाळपोळ अन् तोडफोड केली, परिवर्तन चौकात ही हिंसक घटना घडली. 

06:01 PM

नवी दिल्लीतील काही भागात कलम १४४ लागू, सोशल मीडियावरही लक्ष

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन पेटल्याने नवी दिल्लीतील काही भागात पोलिसांनी कलम १४४ लागू केलं आहे. त्याचसोबत सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 

05:30 PM

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महत्वाची बैठक, देशभरातील आंदोलनाचा आढावा घेणार

04:57 PM

उद्या सकाळी ९ पर्यंत आसाममध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

04:56 PM

लखनौ येथे आंदोलन नियंत्रणात, ४० ते ५० जणांना पोलिसांकडून अटक

लखनौ येथील आंदोलन सध्या नियंत्रणात आहे. हिंसक आंदोलकांकडून जाळपोळ, तोडफोडीचे प्रकार घडले. हसीनाबाद येथे आतापर्यंत ४० ते ५० जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती लखनौ येथील पोलीस अधिक्षकांनी दिली. 

04:54 PM

एअर इंडियाच्या विमान वाहतुकीवर परिणाम

04:33 PM

ऑगस्ट क्रांती मैदानात CAA कायद्याविरोधात आंदोलक एकवटले

04:28 PM

मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात CAA कायद्याविरोधात आंदोलन

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हम भारत के लोग या बॅनरखाली नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यासाठी आंदोलक एकवटले

04:24 PM

जमावाने मीडियाच्या ओबी व्हॅन पेटवल्या, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लखनौत आंदोलन पेटलं, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला तर उग्र आंदोलकांनी मीडियालाही लक्ष्य केलं. 

03:58 PM

उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांंना परिवर्तन चौकात आंदोलन करताना घेतलं ताब्यात 

03:55 PM

CAA कायद्याविरोधात नागपूरात आंदोलकांनी काढला मोर्चा

03:52 PM

एम्स प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सूचना पत्रक केलं जारी

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) प्रशासनाने आपले कर्मचारी, प्राध्यापक, निवासी डॉक्टर, परिचारिका व विद्यार्थ्यांना एम्समध्ये किंवा परिसरात कोणताही धरणे किंवा निषेध सभा घेण्यास टाळावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. 

03:45 PM

जामिया विद्यापीठाच्या गेटसमोर मुस्लीम विद्यार्थ्यांकडून नमाज पठण

03:43 PM

जामिया हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने पाठविली केंद्र आणि पोलिसांना नोटीस

दिल्ली हायकोर्टाकडून जामिया विद्यार्थी मारहाणप्रकरणी केंद्र आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठविली. याबाबत पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

03:38 PM

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक

काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे. देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितले जात आहे. 

03:36 PM

CAA कायद्याविरोधात उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये आंदोलन पेटलं

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लखनौ येथील हसनगंज परिसरात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली तसेच अनेक गाड्यांची जाळपोळ करुन सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला. 

Web Title: Citizenship Amendment Act Live Updates: Protest against CAA in Delhi, West Bengal, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.