अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 12:54 PM2022-05-09T12:54:17+5:302022-05-09T12:54:38+5:30

यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते.

Chowk named after Lata Mangeshkar in Ayodhya; Decision of Uttar Pradesh Government | अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

अयोध्येत लता मंगेशकरांच्या नावे चौक; उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

Next

- राजेंद्रकुमार
लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ : प्रभू श्रीराम नगरी अयोध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण भव्य राम मंदिर किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा हे मात्र नाही. यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यामुळे ही चर्चा आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयानुसार, अयोध्येतील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले जाणार आहे. कोणत्या चौकाला हे नाव द्यायचे, याचा निर्णय घेण्यासाठी अयोध्या पालिकेला १५ दिवसांचा वेळ दिला आहे.

यूपीमधील निवडणुकीच्या प्रचारावेळी योगींनी याबाबत घोषणा केली होती. लता मंगेशकर यांना ही श्रद्धांजली असेल, असे ते म्हणाले होते. या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली होती. भाविक जेव्हा राम मंदिर पाहण्यासाठी येतील, तेव्हा या निमित्ताने लता मंगेशकर यांच्या भजनांचेही त्यांना स्मरण होईल. 

काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?
 ६ मे रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा अयोध्येत भगवान रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मंदिराची पाहणी केली व अयोध्येच्या विकास कामांबाबत माहिती घेतली. 
याचवेळी ते म्हणाले होते की, अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावे चौक उभारून आश्वासनाची पूर्तता केली जाईल. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. 
अयोध्येत भगवान श्रीरामांचे दर्शन करणारे भाविक लता मंगेशकर यांचे नाव असलेल्या चौकातून हनुमान गढी व राम जन्मभूमीकडे जातील.

Web Title: Chowk named after Lata Mangeshkar in Ayodhya; Decision of Uttar Pradesh Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.