शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सागरी हद्दीत घुसलेल्या चिनी जहाजाला भारतीय नौदलाने लावले हुसकावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:10 IST

भारतीय नौदलाच्या सागरी पळत ठेवणाऱ्या विमानाने हे चिनी जहाज शोधून काढले आणि जहाजाला हुसकावून लावले.

ठळक मुद्देअंदमान - निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान १ या चिनी जहाजाचे गुप्तपणे संशोधन कार्य सुरु होते. चीनच्या गुप्त हालचालींवर भारतीय नौदल डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे.

नवी दिल्ली - पोर्ट ब्लेअरजवळील भारताच्या सागरी हद्दीत परवानगीशिवाय घुसलेल्या संशयीत चिनी जहाजाला भारतीय नौदलाने हुसकावून लावले आहे. अंदमान - निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान १ या चिनी जहाजाचे गुप्तपणे संशोधन कार्य सुरु होते. भारतीय नौदलाच्या सागरी पळत ठेवणाऱ्या विमानाने हे चिनी जहाज शोधून काढले आणि जहाजाला हुसकावून लावले.भारतीच नौदलाच्या हालचाली आणि कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी हेरगिरी करण्यासाठी या जहाजाचा चीनकडून वापर होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. नूडलच्या विमानालाभारताच्या आर्थिक क्षेत्रात (एक्सक्लुसिव्ह इंडियन इकॉनॉमी झोन) चिनी जहाज सापडले. त्यावेळी भारतीय नौदलाकडून या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवण्यात आली.आंतराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार अशा प्रकारे कुठल्याही देशाच्या एक्सक्लुसिव्ह इंडियन इकॉनॉमी झोनमध्ये परवानगीशिवाय दुसऱ्या देशाचे जहाज प्रवेश करू शकत नाही.  नौदलाच्या युद्धनौकेने या जहाजाला भारतीय सागरी हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर शी यान १ हे चिनी जहाज भारतीय सागरी हद्दीतून बाहेर पडले. अलीकडेच भारतीय समुद्रात पी - ८आय या टेहळणी करणाऱ्या नौदलाच्या विमानाने चिनी ७ युद्धनौका हेरल्या होत्या. चीनच्या गुप्त हालचालींवर भारतीय नौदल डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतindian navyभारतीय नौदल