ब्रेकअप, शौचालय, रेझर अन् स्वतःवर वार; दिल्ली विमानळावर चिनी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 06:12 IST2023-01-10T06:12:20+5:302023-01-10T06:12:34+5:30

सदर तरुणी शनिवारी रात्री उशिरा बहरिनहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-३ येथे उतरली होती

Chinese girl's suicide attempt at Delhi airport; Information about breaking up with a lover | ब्रेकअप, शौचालय, रेझर अन् स्वतःवर वार; दिल्ली विमानळावर चिनी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ब्रेकअप, शौचालय, रेझर अन् स्वतःवर वार; दिल्ली विमानळावर चिनी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : नोकरी गेल्याचे दुःख आणि प्रियकराने संबंध तोडल्याने आलेल्या नैराश्यामुळे एका २९ वर्षीय चिनी तरुणीने दिल्लीविमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न केला. शौचालयात जाऊन तिने स्वतःवर रेझरचे वार करून घेतले. मात्र, वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने तिचा जीव वाचला. 

ही तरुणी शनिवारी रात्री उशिरा बहरिनहून दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-३ येथे उतरली होती आणि मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला जाणार होती. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने स्वतःचा गळा आणि हात कापून घेतला, असे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तिला तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी दिल्ली पाेलिस प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन तपास करत आहेत. 

Web Title: Chinese girl's suicide attempt at Delhi airport; Information about breaking up with a lover