शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानला बांधायचंय धरण; पण इतिहासप्रेमींचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 4:14 PM

मग 14व्या आणि 15व्या शतकात जेव्हा मुस्लिम या भागात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. परंतु यापैकी अनेक दगडांवर अजूनही कोरलेली कलाकृती आहेत.

ठळक मुद्देगिलगिट-बाल्टिस्तानमधलं हवामान भारतानं वर्तवण्यास सुरुवात केल्यापासून पाकच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. चीन पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये धरण बांधून देणार असल्याची चर्चा आहे. परंतु तिथल्या इतिहासप्रेमींनी याला विरोध केला आहे.  प्रथम त्या भागाचा ऐतिहासिक वारसा जतन केला जावा, अशी तिथल्या स्थानिकांची मागणी आहे.

नवी दिल्लीः पाकव्याप्त काश्मीरवरून सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधलं हवामान भारतानं वर्तवण्यास सुरुवात केल्यापासून पाकच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यामुळेच पाकिस्तानचीनच्या मदतीनं गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये धरण बांधण्याच्या प्रयत्नात आहे. चीन पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये धरण बांधून देणार असल्याची चर्चा आहे. परंतु तिथल्या इतिहासप्रेमींनी याला विरोध केला आहे.प्रथम त्या भागाचा ऐतिहासिक वारसा जतन केला जावा, अशी तिथल्या स्थानिकांची मागणी आहे. चीन ज्या ठिकाणी धरण बांधत आहे, त्यामुळे डायमर, हुंझा, नगर आणि बाल्टिस्तान जिल्ह्यांतील अनेक भाग पाण्याखाली बुडतील. जी चार शहरं पाण्यासाठी जाण्याची भीती आहे, त्यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बौद्ध धर्माशी संबंधित या चार शहरांमधील दगडांवर शेकडो पौराणिक कलाकृती कोरलेली आहेत. आता धरण बांधल्यास या सर्व कलाकृती पाण्यात बुडतील, अशी स्थानिकांना भीती आहे. म्हणून धरण बांधण्यापूर्वी त्या कलाकृती जतन करून ठेवल्या पाहिजेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.गिलगिट-बाल्टिस्तानचे स्थानिक रहिवासी आणि इतिहासप्रेमी अरब अली बेग यांनी ट्विटरवर या ऐतिहासिक रॉक आर्टची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांनी लिहिले आहे की, दगडांवर अशा कलाकृती डायमर, हुंझा, नगर आणि बाल्टिस्तानमध्ये बर्‍याच ठिकाणी दिसतील. या कलाकृती 269 ते 232 इसवी सन पूर्व काळात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत बनवल्या गेल्या. जुने स्तूप आणि बौद्ध मठ इथे होते. मग 14व्या आणि 15व्या शतकात जेव्हा मुस्लिम या भागात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. परंतु यापैकी अनेक दगडांवर अजूनही कोरलेली कलाकृती आहेत. पाकिस्तान सरकारने 13 मे रोजी धरण बांधण्यासाठी चिनी कंपनीला 20,797 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं आहे. दीमिर शहरात हे धरण बांधले जात आहे. यासह चार शहरांतील सुमारे 50 गावे पाण्यात बुडतील. त्यामध्ये ही ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणही पाण्याखाली जातील. गिलगिट-बाल्टिस्तानच्या अनेक मुस्लिम विद्वानांनी या ऐतिहासिक वारशासंदर्भात सोशल मीडियावर वादविवाद सुरू केले आहेत. प्रत्येक जण असे म्हणत आहे की, हा वारसा जतन करणे आवश्यक आहे. हा वारसा बौद्ध धर्माचा प्रतीक असून, तो या क्षेत्रात पर्यटनाच्या शक्यता वाढवू शकतो. म्हणून पाकिस्तान आणि चीन या दोघांनी मिळून प्रथम या कलाकृती सुरक्षित केल्या पाहिजेत. मगच धरण बांधण्याचा विचार करायला हवा. ‘स्टेट्समॅन डॉट कॉम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या भागातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अहमद हसन दानी यांनी सांगितले की, या दगडांना चार विभागांमध्ये विभागले गेले आहे. सर्वात जुन्या दर्जाचे दगड दुसर्‍या शतकातील असू शकतात किंवा इसवी सन पूर्व 5 वा 6 शतकातील असू शकतात. अलीकडेच लेहला भेट देणाऱ्या दलाई लामा यांनीही गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या या ऐतिहासिक कलाकृती जतन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, संपूर्ण सिंधू नदीच्या काठी असे दगड सापडतील. लडाख हा केंद्रशासित प्रदेशात येतो, तिथल्याही दगडांवर मंदिरे, बौद्ध भिक्षू, बौद्ध गुरू, प्राणी-प्राणी यांचे शिल्पचित्र आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे आतापर्यंत पाकिस्तान सरकार या कलाकृतींकडे दुर्लक्ष करत आलं आहे.

हेही वाचा

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

Cyclone Amphan : तो येतोय..., चक्रीवादळाची चाहूल लागल्यानं घाबरलंय ओडिशा

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेPakistanपाकिस्तानchinaचीन