CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:20 PM2020-05-20T12:20:53+5:302020-05-20T12:22:19+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते.

donald trump said i am taking hydroxychloroquine expert says danger vrd | CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प घेताहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध; तज्ज्ञ म्हणतात...

Next

वॉशिंग्टनः कोरोना विषाणूचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, अनेक देश त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप त्यावर कोणतीही लस तयार झालेली नाही. अमेरिका, रशिया सारख्या महासत्तांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक असल्याचेही ते म्हणाले होते.

वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. या गुणकारी औषधाबाबत अनेक चांगल्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. हे औषध घेतल्याने अमुक एक दुष्परिणाम होतील असे जे बोलले जाते त्यात तथ्य नाही. मी हे औषध घेतल्यानंतरही धडधाकट आहे. तुमच्यासमोर उभा आहे, असेही ते म्हणाले होते. 

दरम्यान, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार केल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक स्कमर यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी विशिष्ट औषधामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध करता येतो असे सांगून विनाकारण आशा पल्लवित केल्या आहेत. ट्रम्प करत असलेली कृती भयंकर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध आपल्याला देण्यात यावे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील डॉक्टरना सांगितले होते. ट्रम्प यांच्या म्हणण्याला डॉक्टरांनी एका पत्रकाद्वारे दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची रोज कोरोना चाचणी केली जाते. या विषाणूचा त्यांना संसर्ग झालेला नसल्याचा निष्कर्ष त्यातून आला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध ४० वर्षांपासून मलेरिया व इतर आजारांवर घेतले जाते. संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी हे औषध घेत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

तज्ज्ञ म्हणतात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर धोकादायक
मिलर फॅमिली हार्ट संस्थेचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. स्टीव्हन ई. निसेन म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या अतिवापरामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचवेळी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर डॉ. स्कॉट सोलोमन यांनीही याला प्राणघातक म्हटले आहे. काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते हे औषध हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करते.

एफडीएनेही दिला इशारा
महिनाभरापूर्वी अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने असा इशारा दिला होता की, कोरोना प्रतिबंधात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर करू नये. कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये हे औषध किती प्रभावी आहे याचा ठोस पुरावा नाही. ट्रम्प यांच्याआधी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो यांनीही या औषधाला पाठिंबा दर्शविला होता.

हेही वाचा

CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात 6 कोटी लोक गरिबीच्या विळख्यात सापडणार

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही; कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

Web Title: donald trump said i am taking hydroxychloroquine expert says danger vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.