'चीन आपला शत्रू नाही'; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:00 IST2025-02-17T12:45:28+5:302025-02-17T13:00:56+5:30
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

'चीन आपला शत्रू नाही'; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पित्रोदा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'भारताने चीनला शत्रू मानणे थांबवावे, या विधानानंतर आता भाजपाने टीका केली आहे.
"ठाकरेंचा पक्ष फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर; आमदार-खासदारांना पैशाचं आमिष"
सॅम पित्रोदा म्हणाले, 'चीनने केलेली फसवणूक काय आहे हे मला समजत नाही. मी म्हणतो की हा मुद्दा भरपूर पुराव्यांसह उपस्थित केला जात आहे कारण अमेरिकेचा स्वभाव शत्रूंना लक्ष्य करण्याचा आहे. देशभरातील लोक एकत्र येऊन लढतील अशी वेळ आली आहे. पित्रादा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेटीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता.
सॅम पित्रोदा म्हणाले, 'सुरुवातीपासूनच आमचा दृष्टिकोन संघर्षाचा राहिला आहे आणि या दृष्टिकोनामुळे शत्रू निर्माण होतात. त्या बदल्यात, देशातून पाठिंबा मिळतो. आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल आणि पहिल्या दिवसापासून चीन आपला शत्रू आहे असे मानणे थांबवावे लागेल. हे चुकीचे आहे आणि फक्त चीनमध्येच नाही, तर हे सर्वांमध्येच चुकीचे आहे, असंही पित्रोदा म्हणाले.
दरम्यान, आता सॅम पित्रोदा यांच्या विधानावरुन भाजपाचे प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनीही या मुद्द्यावर कँग्रेस खासदार राहुल गांधी यांना घेरले आहे. सिन्हा म्हणाले की, 'ज्यांनी आमची ४० चौरस किलोमीटर जमीन चीनला दिली, त्यांना चीनकडून कोणताही धोका दिसत नाही. राहुल गांधी चीनला घाबरतात आणि आयएमईईसीच्या घोषणेपूर्वीच बीआरआयसाठी आग्रह धरत होते यात आश्चर्य नाही.
"काँग्रेस पक्षाच्या चीनबद्दलच्या आकर्षणाचे रहस्य २००८ मध्ये झालेल्या काँग्रेस-सीसीपी सामंजस्य करारात लपलेले आहे, असा पलटवार त्यांनी केला.