नवी दिल्ली: लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना चीननं पँगाँग लेक परिसरापासून २०० किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. या भागात असलेल्या विमानतळावर चीनकडून बांधकाम सुरू असल्याचं दृश्य सॅटलाईटमधून घेण्यात आलेल्या फोटोंच्या माध्यमातून समोर आलं आहे. लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं. त्यावेळी वाद झाल्यानंतर दोन्ही देशांनी या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला.डेट्रेस्फानं (detresfa_) तिबेटमधल्या नगरी गुन्सा विमानतळाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. यातील पहिला फोटो ६ एप्रिल २०२० रोजी काढण्यात आलेला आहे. तर दुसरा फोटो २१ मे रोजी टिपण्यात आला आहे. या दीड महिन्यांच्या कालावधीत चीननं मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं दिसत आहे. नगरी गुन्सा विमानतळावर गेल्या महिन्यात एकच धावपट्टी होती. आता या भागात दुसऱ्या धावपट्टीचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याचं दिसत आहे. लढाऊ विमानांसाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे. 'एनडीटीव्ही'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनातपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत