शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 15:45 IST

याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. यात दोन्ही देशांच्या सैनिकांना दुखापत झाली होती.

ठळक मुद्देडोकलाममध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर आता पहिल्यांदाच भारत आणि चीनचे लष्कर समोरासमोर याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता9 मेरोजी भारत आणि चीनी सैन्यांत सिक्किमच्या नकुला सेक्टरमध्येही वाद झाला होता.

नवी दिल्ली : डोकलाममध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादानंतर आता पहिल्यांदाच भारत आणि चीनचे लष्कर समोरासमोर आले आले असून संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले आहेत. मात्र, डोकलामच्या घटनेनंतरही सीमेवर अनेकदा छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र यावेळी लद्दाख सीमेवर जवानांची संख्या वाढविण्यापर्यंत प्रकरण ताणले गेले आहे. येथे चीनीसैनिकांनी टेन्ट लावले आहेत. तर दुसरीकडे भारतानेही आपली शक्ती वाढवली आहे. 

याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. यात दोन्ही देशांच्या सैनिकांना दुखापत झाली होती. यानंतर प्रोटोकॉलनुसार, हा वाद संपवण्यात आला होता. यानंतर 9 मेरोजी भारत आणि चीनी सैन्यांत सिक्किमच्या नकुला सेक्टरमध्येही वाद झाला होता. मात्र, यानंतर स्थानिक पातळीवरच दोन्ही पक्षांना शांत करण्यात आले.

GoodNews! देशातील 'या' जिल्ह्यांत रिकव्हरी रेटची 100 टक्क्यांकडे वाटचाल, कोरोनाला देतायत 'टफ फाईट'

यामुळे घाबरतोय चीन -चीनच्या, अशा वागण्यामागे त्याची भीतीही दडलेली आहे. चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागांत 61 रस्त्यांचे काम आणि दुरुस्ती करण्यासाठी 2018-19 ते 2022-23पर्यंत बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशनने एक विशेष योजना तयार केली आहे. 272 पैकी 3323.57 किमी लांब असलेल्या 61 रस्त्यांची ओळख एक विशेष रणनीती म्हणून करण्यात आली आहे. यापैकी 2304.65 किमीवरील काम पूर्ण झाले आहे. इतर रस्त्यांवरील कामे प्रगतीपथावर आहेत.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना व्हॅक्सीनची आशा वाढली; ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची टेस्ट पुढच्या स्टेजवर

हा आहे तणावाचा मुख्य मुद्दा  -असे समजते, की सध्या श्योक आणि गलवान नदीवर काम सुरू आहे. चीनने डब्रुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडसंदर्भात, लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलअंतर्गत, या कामांवर आक्षेप घेतला आहे. भारत-चीन बॉर्डरवरील तणावाचा मुद्दा केवळ रस्ता निर्मितीचा आहे. चीनचे म्हणणे आहे, की भारत रस्ता तयार करण्यासाठी चीनच्या सीमेचा वापर करत आहे. तर भारताचे म्हणणे आहे, की ते आपल्या सीमेतच कामे करत आहेत. 

CoronaVirus News: 'या' देशात मोठी Tragedy बनलाय कोरोना, मृतदेह दफनायलाही कमी पडतेय जागा

 

 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतBorderसीमारेषाSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान