धक्कादायक!मॅनहोलवर फटाके फोडू लागले चिमुकले, गटारातून येणाऱ्या गॅसने घेतला पेट अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:45 IST2021-10-28T18:45:08+5:302021-10-28T18:45:27+5:30
गटारातून जाणारी गॅस लाइन फुटली होती, मुलांनी फटाके फोडताच आगीचा मोठा भडका उडाला.

धक्कादायक!मॅनहोलवर फटाके फोडू लागले चिमुकले, गटारातून येणाऱ्या गॅसने घेतला पेट अन्...
सूरत:गुजरातच्या सुरतमध्ये दिवाळीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. 5 लहान मुले मॅनहोल(गटाराचे झाकन)वर बसून फटाके फोडत होते. यादरम्यान गटारातून निघणाऱ्या गॅसने अचानक आग पकडली आणि मोठा भडका उडाला. या घटनेत सर्व मुले भाजले गेले असून, सर्वांना रुग्णालयातून प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील तुळशी दर्शन सोसायटीतील गटारातून एक गॅस लाइन गेली आहे. घटनेवेळी त्या गॅस लाइलमधून गॅस गळती सुरू होती. मुलांना आणि इतर कोणालाही त्या गॅस गळतीबाबत माहिती नव्हती. मुले त्या गटाराच्या मॅनहोलवर बसून फटाके फोडत होते, तेव्हा गटारातून येणाऱ्या गॅसने अचानक पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. ही घटना एका घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुदैवाने सर्व मुले सुखरुप वाचली असून, त्यांचे शरीर किरकोळ भाजले गेले आहे.
परिसरात खोदकाम केल्याने गळती
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत ग्राउंड गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. बुधवारी गल्ली क्रमांक-7जवळ एका मशिनमुळे पाईपलाईन खराब झाली. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान गटाराच्या झाकणावर फटाके ठेवून मुले खेळू लागली. यामुळे ही घटना घढली. आग लागल्याची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी तात्काळ ती आग आटोक्यात आणली.