लैंगिक छळाला मुलेही तितकीच बळी पडतात : कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:30 IST2025-08-12T10:30:34+5:302025-08-12T10:30:34+5:30
फक्त मुलींवरच अत्याचार होतो हा समाजात पसरलेला समज मूर्खपणा आहे

लैंगिक छळाला मुलेही तितकीच बळी पडतात : कोर्ट
नवी दिल्ली : २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला दिल्लीच्या एका न्यायालयाने १५ वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली. फक्त मुलीच नव्हे, मुलेही लैंगिक छळाला बळी पडतात. फक्त मुलींवरच अत्याचार होतो हा समाजात पसरलेला समज मूर्खपणा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनु अग्रवाल यांनी पॉक्सो कायद्याच्या कलम ६ (गंभीर लैंगिक अत्याचार) आणि आयपीसी ३७७ अंतर्गत दोषी ठरलेल्या आरोपीवर शिक्षा सुनावली.
युक्तिवादादरम्यान, सरकारी वकील अरुण के. व्ही. यांनी अतिरिक्त केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या एका अहवालाचा हवाला दिला, ज्यामध्ये बाललैंगिक शोषणाच्या बळींपैकी सुमारे ५४.६८ टक्के मुले आहेत, असे सांगितले.
न्यायालयाने म्हटले...
पॉक्सो कायदा सर्व मुलांचे रक्षण करतो. लैंगिक अत्याचारामुळे मुलांच्या मनावरही तेवढाच खोल जखमेचा ठसा उमटतो. सामाजिक रचनेमुळे मुलांसाठी आघातातून सावरणे अधिक कठीण होते.