शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल- भाजप आमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 9:03 AM

भाजप आमदाराचं अजब तर्कट

भोपाळ: उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळत असल्याचा अजब दावा भाजपच्या आमदारानं केला आहे. इतकंच नव्हे, तर बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल, असंही या आमदारानं म्हटलंय. पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. वर आणि वधू यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतानाही ज्येष्ठ मंडळींकडून त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. या प्रथेचं आपण समर्थन करत असल्याचं मध्य प्रदेशचे भाजप आमदार गोपाल परमार यांनी म्हटलं.'पूर्वी मुलींचं वय 18 वर्षे होण्याआधीच त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. मुलांचा विवाहदेखील 21 वर्षे पूर्ण होण्याआधीच केला जायचा. पूर्वी कमी वयातच मुलामुलांची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच मुलांचं लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,' असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. परमार मध्यप्रदेशमधील अगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं अजब तर्कट परमार यांनी मांडलं. 'मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,' असं परमार म्हणाले. आपण स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींचे विवाह बालपणीच ठरवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'माझा बालविवाह झालाय आणि माझ्या मुलांची लग्नदेखील मी त्यांच्या लहानपणीच ठरवली आहेत. मी माझ्या दोन मुली आणि एका मुलाचं लग्न सज्ञान होण्याआधीच ठरवलंय,' असं परमार म्हणाले. यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदात असल्याचंही त्यांना सांगितलं.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशLove Jihadलव्ह जिहाद