शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सहारनपूर दंगलीसाठी मुख्यमंत्री जबाबदार - भाजप

By admin | Updated: July 27, 2014 13:10 IST

उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगलीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव जबाबदार असून जातीय तणाव निर्माण करुन सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे असा आरोप भाजपने केला आहे.

ऑनलाइन टीम

सहारनगपूर, दि. २७ - उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगलीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव जबाबदार असून जातीय तणाव निर्माण करुन सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करायचे आहे असा आरोप भाजपने केला आहे. अखिलेश यादव सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरत असल्याची टीकाही भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांनी केली आहे. 
सहारनपूर येथे जमिनीशी निगडीत वादातून शनिवारी दोन समाजात दंगल भडकली होती. या दंगलीत तिघांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.  तणावामुळे सहारनपूर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी दंगलीप्रकरणी २४ जणांना अटक केली असून संशयीतांची चौकशीही सुरु आहे. रविवारी सकाळपासून सहारनपूर येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी संध्या तिवारी म्हणाले, संचारबंदी शिथील करण्याचा अद्याप कोणताही विचार नसून शांतता कायम राहल्यास अधिका-यांशी याविषयावर चर्चा करु.  मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
दरम्यान, या दंगलीवरुन राजकारणही सुरु झाले आहे. समाजवादी पक्षाने दंगलीसाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे. तर भाजप नेते शाहनवाझ हुसैन यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षाला दंगलीसाठी जबाबदार ठरवले आहे. हुसैन म्हणाले, उत्तरप्रदेशमधील सत्ताधा-यांना व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करायचा आहे. तर काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी उत्तरप्रदेशचे विभाजन करावे अशी मागणी केली आहे.