शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

प्रत्येक प्रश्न सर्वोच्च न्यायालयानेच सोडवायचा, तर मग लोकसभा-राज्यसभेची काय गरज? - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 10:01 PM

अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी गुरुवारी राजकीय विषय न्यायालयासमोर आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश म्हणाले, जर मी मान्य केले, की आपल्या सर्व मुद्यांवर आम्ही सुनावणी करू आणि आदेश जारी करू, तर मग लोकसभा आणि राज्यसभेसाठी राजकीय प्रतिनिधीं कशासाठी निवडून आणले जातात? एवढेच नाही, तर आता काय आम्हाला विधेयकही मंजूर करावे लागेल का? असेही  सरन्यायाधीशांनी विचारले आहे.

कोर्टासमोर आला रोहिंग्यांचा मुद्दा - अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे भाष्य केले आहे. अश्विनी उपाध्याय यांनी न्यायालयात याचिका दाखल करत, एका महिन्याच्या आता देशभरातील रोहिंग्या मुसलमानांची ओळख पटवून त्यांना पकडण्याचे आणि परत पाठवण्याचे आदेश सरकारला देण्यात यावेत, अशी विनंती केली होती.

प्रत्येक प्रश्नाचं निराकरण आम्हीच करायचं?मेंशनिंग अवर दरम्यान अश्विनी उपाध्याय यांनी सरन्यायाधिशांसमोर रोहिंग्यांचा मुद्दा ठेवत लगेच सुनावणी करण्याची मागणी केली. अश्विनी उपाध्याय म्हणाले, पाच कोटी रोहिंग्या रिफ्यूजी आमचा जगण्याचा अधिकार आमच्याकडून हिरावत आहेत. यावर सीजेआय म्हणाले, मिस्टर उपाध्याय, आम्ही रोज काय पलीच केस ऐकण्यासाठी बसलो आहोत का? सूर्याखाली जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या सर्व, संसदेच्या समस्या, नॉमिनेशनच्या समस्या, इलेक्शन रिफॉर्मस, सर्व काही आम्हीच ऐकायचं का? हे सर्व राजकीय मुद्दे आहेत. हे सरकार समक्ष ठेवाण्याऐवजी न्यायालयासमोर ठेवले आहेत. सरन्यायाधीश म्हणाले, गंभीर राजकीय विषय न्यायालयापुढे आणून न्यायालयावर ओझे टाकले जात आहे. खरे तर, हे मुद्दे सरकारनेच सोडवायला हवेत.

यावर अश्विनी उपाध्याय म्हणाले, यावर काही राज्यांनीही उत्तर दिले आहे. यावर सीजेआय यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विचारणा केली, की जर आपल्याकडे काउंटर अॅफिडेव्हिट असेल तर, आम्ही ही केस लिस्ट करू शकतो. यावर आपल्याला या केससंदर्भात काहीही माहीत नाही, असे सॉलिसिटर जनरल म्हणाले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाRohingyaरोहिंग्याN V Ramanaएन. व्ही. रमणा