chidambaram attack on imf and its chief economist gita gopinath by govt imminent over gdp | "मोदी अन् शाह जोडी लोकशाहीला बरबाद करतेय"

"मोदी अन् शाह जोडी लोकशाहीला बरबाद करतेय"

ठळक मुद्देमोदी सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोठा झटका दिला आहे. 2019-20नंतर भारताच्या सकल घरगुती उत्पादना(जीडीपी)च्या अंदाजात वाढ फक्त 4.8 टक्के राहील. आयएमएफच्या अहवालावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः मोदी सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोठा झटका दिला आहे. 2019-20मध्ये भारताच्या सकल घरगुती उत्पादना(जीडीपी)च्या अंदाजात वाढ फक्त 4.8 टक्के राहील. आयएमएफच्या अहवालावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी खरी वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्यांना आता लक्ष्य केलं जाईल, असं पी. चिदंबरम म्हणाले आहेत. 
सर्वात पहिल्यांदा नोटाबंदीच्या निर्णयावर आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी टीका केली होती. आता मोदींचे मंत्रीसुद्धा त्यांच्यावर हल्लाबोल करतील. अनेक प्रयत्नांनंतरही जीडीपी 4.8 टक्केच राहणार आहे. हा विकासदर आणखी खाली घसरला तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असंही ट्विट करत पी. चिदंबरम यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

आयएमफनं 2019साठी भारताचा जीडीपी घटवून 4.8 टक्के केला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या छायेत आली आले. पूर्ण भारतात तरुण पिढी आणि वयोवृद्ध लोक आंदोलन करत आहेत. तर मोदी अन् शाह जोडी लोकशाहीला कमकुवत करत आहे, असा आरोपही काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. तत्पूर्वी आयएमएफची मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी जागतिक वाढीच्या अंदाजात 80 टक्के घसरणीकरिता भारत जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. 2019चा जागतिक विकासदर 2.9 टक्के आणि 2020साठी त्याच विकासदराचा अंदाज 3.3 टक्के नोंदवण्यात आला आहे. जो ऑक्टोबर महिन्यात 0.1 टक्क्यानं कमी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं जगाला कशा पद्धतीनं प्रभावित केलं, याचं उदाहरणही त्यांनी दिलं आहे. आर्थिक वर्षं 2019-20मध्ये भारताची सकल घरगुती उत्पादना(जीडीपी)तील वाढीचा अंदाज हा फक्त 4.8 टक्के राहणार आहे. भारत आणि त्याच्या सारख्याच इतर उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेत सुस्ती आल्यानं जगातील वाढीचा अंदाज कमी करावा लागला आहे. आयएमएफनं दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचा(WEF)च्या बैठकीदरम्यान या विकासदराचा अंदाज घटवला आहे. 

Web Title: chidambaram attack on imf and its chief economist gita gopinath by govt imminent over gdp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.