"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:12 IST2025-10-09T13:11:09+5:302025-10-09T13:12:27+5:30
मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी "बस्तर बदलत आहे. आता येथे बंदूक आणि दारुगोळ्याचा धूर नाही तर विकास आणि विश्वासाचे वारे वाहत आहेत" असं म्हटलं आहे.

"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी "बस्तर बदलत आहे. आता येथे बंदूक आणि दारुगोळ्याचा धूर नाही तर विकास आणि विश्वासाचे वारे वाहत आहेत" असं म्हटलं आहे.
"राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण २०२५ आणि पूना मारगेम: पुनर्वसन ते पुनरुज्जीवन यांसारख्या मानवतावादी मोहिमांनी एकेकाळी लाल दहशतीच्या मार्गावर गेलेल्या लोकांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला आहे."
शांतता, शिक्षण, सन्मानपूर्ण जीवनाची नवी वाट
"आज नारायणपूर जिल्ह्यात १६ माओवादी कॅडर्सनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परत येण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या या कॅडर्सवर एकूण ४८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्यांनी आता शांतता, शिक्षण आणि सन्मानपूर्ण जीवनाची नवी वाट निवडली आहे."
"राज्य सरकारच्या धोरणांवर जनतेचा विश्वास वाढला आहे आणि सुरक्षा दलांच्या दृढतेमुळे विकास आणि विश्वासाचे वातावरण तयार झालं आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
२० महिन्यांत १,८३७ माओवाद्यांनी सोडला हिंसेचा मार्ग
"गेल्या २० महिन्यांत एकूण १,८३७ माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. हा बदल या गोष्टीचा पुरावा आहे की, डबल इंजिन सरकारची धोरणं केवळ शांतताच आणत नाहीत, तर बस्तरला एका नव्या युगाकडे घेऊन जात आहेत."
"राज्य सरकारचा उद्देश केवळ नक्षलवाद संपवणं नाही, तर बस्तरच्या प्रत्येक गावापर्यंत विकास, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचा प्रकाश पोहोचवणं आहे" अशी माहिती मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी दिली आहे.