शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

सात वेळा आमदार राहिलेला मंत्री पराभूत; समाजाच्या एकीमुळे शेतकरी बनला 'भाजपा'चा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:43 IST

ishwar sahu news : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले.

रायपूर : लोकसभा २०२४ च्या सेमी फायनलमध्ये अर्थात ४ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-१ असा विजय मिळवला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येभाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. तर तेलंगाणात केसीआर यांच्या पक्षाचा पराभव झाला अन् जनतेनं सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडं सोपवल्या. राजस्थानच्या जनतेनं आपली परंपरा कायम राखत सत्ताबदल केला. खरं तर १९९० पासून राजस्थानात एकदाही एका पक्षाला सलग दोनदा सत्ता मिळवता आलेली नाही. मात्र, छत्तीसगडच्या निकालानं सर्वांना धक्का दिला. कारण भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. 

दरम्यान, छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. इथं भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. पण, एका सामान्य कुटुंबातील शेतकरी ईश्वर साहू यांनी सात वेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचा पराभव करून मोठा धक्का दिला. या जागेवरून साहू यांच्याविरोधात मंत्री रविंद्र चौबे मैदानात होते. खरं तर दुसऱ्या समुदायाच्या जमावाने केलेल्या हिंसाचारात साहू यांनी आपल्या 'लेका'ला गमावले. साहू यांच्या मुलाची निघृण हत्या केल्यामुळंं जनतेत संतापाची लाट होती, ज्याचेच परिणाम निकालात दिसून आले.  

ईश्वर साहू यांचा विजय भारतीय जनता पक्षानं जनतेचा आक्रोश पाहून ईश्वर साहू यांना तिकिट दिलं. साहू यांनी एकूण १०१७८९ मतं मिळवली आणि चौबे यांना ५१९६ मतांनी पराभवाची धूळ चारली. साजा विधानसभा मतदारसंघात एप्रिलमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. शाळेतील भांडणापासून सुरू झालेल्या या दंगलीने धार्मिक हिंसाचाराचं रूप घेतलं. वाद वाढल्यानं हिंसाचाराची आग सर्वत्र पसरली. घरं जाळण्यात आली, निष्पापांना नाहक त्रास सहन करावा लागला. याच हिंसाचारात ईश्वर साहू यांचा मुलगा भुवनेश्वर साहू याची हत्या करण्यात आली. मग भाजपाने मृत भुवनेश्वरच्या वडिलांना तिकिट दिलं आणि ते आमदार बनले. 

ईश्वर साहू यांच्या विजयानंतर राजकीय पंडित आपापली मतं मांडत असून, भावनिकतेच्या मुद्द्यामुळे साहू यांचा विजय झाला असल्याचं सांगत आहेत. साजा मतदारसंघात ६० हजार मतदार हा 'साहू' आहे आणि याचाच फायदा ईश्वर साहू यांना झाला. साहू समाजाने एकत्रित येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मतदान केलं अन् आपल्याच समाजाचा उमेदवार निवडून आणला. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरी