शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:38 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये  खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये  खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत यासंदर्भात कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची मागणी केली. 

राज्यसभेमध्ये मराठी भाषेतून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करताना छत्रपती संभाजी राजे म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला भारतात पहिल्यांदा आरक्षण दिले होते. आरक्षण मिळालेल्या समाजामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांच्यासोबत मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र स्वातंत्रोत्तर काळात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी अनेक मोर्चे निघाले. या मोर्चांची दखल केवळ देशातच नव्हे तर परदेशातली घेतली गेली. मात्र आज परिस्थिती बिघडली आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून तोडगा काढण्याची गरज आहे."सध्या पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संभाजी राजेंनी दोन उपाय सूचवले आहेत. ते म्हणाले, यावर तोडगा काढण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मराठा समजातील घटकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात. दुसरी माझी मागणी म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलावून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात . 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाreservationआरक्षणRajya Sabhaराज्यसभा