Video: गुजरातमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; ६० टँकर जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:01 IST2023-10-25T10:58:08+5:302023-10-25T11:01:10+5:30

केमिकल कंपनीतील आगीच सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

Chemical company fire in Gujarat; Burn 60 tankers in aravali | Video: गुजरातमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; ६० टँकर जळून खाक

Video: गुजरातमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; ६० टँकर जळून खाक

अरावली - गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील एका केमिकल कंपनीत आग लागल्याची भीषण दुर्घटना घडली. या आगीत केमिकलने भरलेले तब्बल ६० टँकर जळून खाक झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 

केमिकल कंपनीतील आगीच सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण शोधण्यात येत आहे. आगीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओतून आगीची तीव्रता लक्षात येऊ शकते. धुराचे लोट आकाशात जाताना दिसत आहेत. त्यावरुन, आगीचे रौद्र रुप दिसून येते.

 

Web Title: Chemical company fire in Gujarat; Burn 60 tankers in aravali