'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:21 IST2025-08-28T16:20:21+5:302025-08-28T16:21:54+5:30
Rescue Operation By Indian Army Video: पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती असंख्य ठिकाणी लोक पुरात अडकले. त्यांच्या मदतीला भारतीय लष्कर देवदूत बनून धावले.

'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
Indian Army rescue operation video: पुराने वेढा दिला... अनेक लोक अडकल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराचे तीन चिता हेलिकॉप्टर हवेत झेपावले आणि जवान देवदूत बनून त्यांच्या मदतीला पोहोचले. खराब हवामानामुळे खडतर परिस्थिती असतानाही भारतीय लष्कराने २७ नागरिकांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. या बचाव मोहिमेचा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकणारा आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसत असून, नागरिकांना एका छोट्या बेटावरून हेलिकॉप्टरमध्ये बसवण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर भारतात कोसळत असलेल्या पावसामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशपासून पंजाबपर्यंत अनेक ठिकाणी नद्यांना महापुर आले असून, भारतीय लष्कर पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी उतरले आहे. पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये पुराने वेढा दिल्याने मृत्यूच्या जबड्यात अडकलेल्या २७ जणांना भारतीय लष्कराने सुखरुपपणे बाहेर काढले.
लष्कराचे रेस्क्यू, २७ जणांचा वाचला जीव
Update: Flood Relief Operations
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 28, 2025
The #IndianArmy in response to the massive floods in parts of Punjab, has deployed Army Aviation Helicopters for flood relief and rescue operations as part of its #HADR efforts . Displaying selfless commitment and extraordinary flying skills, the… pic.twitter.com/BhXbUB59UP
२७ ऑगस्ट रोजी सांयकाळी ४ वाजेच्या सुमारास गुरूदासपूर जिल्ह्यातील लस्सीयन भागात पुराचे पाणी वाढत असल्याची माहिती लष्कराच्या नियंत्रण कक्षाला मिलाळी. त्यानंतर तिथे असलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली.
भारतीय लष्कराच्या हवाई दलाचे तीन चिता हेलिकॉप्टर हवेत झेपावले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे परिस्थिती प्रतिकुल असूनही लष्कराच्या जवानांनी लस्सीयन भागात अडकलेल्या २७ नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढले.