दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल--- जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30
त्यानंतर अनुपम डाग्नोस्टीक सेंटरमधील सोनोग्राफी मशिन जप्त करून सीलबंद करण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलची रेकॉर्ड तपासणी केली असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.

दोन डॉक्टरांसह चौघांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल--- जोड
त यानंतर अनुपम डाग्नोस्टीक सेंटरमधील सोनोग्राफी मशिन जप्त करून सीलबंद करण्यात आले आहे. सदर हॉस्पिटलची रेकॉर्ड तपासणी केली असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.याप्रकरणी शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.यशवंत पांडुरंग नजन यांच्या अनुपम डाग्नोस्टिक सेंटर येथे बनावट गरोदर महिला रुग्ण पाठविली असता डॉ.नजन यांनी सोनोग्राफी करून मुलगा आहे की मुलगी आहे, हे त्यांच्या कोडवर्डमध्ये सुरज जगन्नाथ काटकर यांच्यामार्फत सांगितले. यासाठी त्यांना शेवगाव येथील डॉ.प्रल्हाद वैजीनाथ पाटील व संगिता शिवाजी खंडागळे यांनी सहकार्य व मदत केली, या प्रकरणी वरील चारही आरोपींवर शासनाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारीत २००३ नुसार शेवगाव न्यायालयात चार्टशीट दाखल करण्यात आले आहे.चौकट....शेवगाव तालुक्यात गर्भलिंग निदान तपासणी होत असल्याची खुलेआम चर्चा होती, मात्र याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे आले नव्हते. विशेष पथकाच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे लोकांच्या तक्रारीत तथ्य असल्याची बाब पुढे आली आहे. शेवगाव तालुक्यात दक्षता पथक कार्यरत असून, त्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांचा समावेश आहे, मात्र गेल्या काही दिवसात पथकाच्या कारवाईची माहिती पुढे आलेली नाही. तालुक्यात सर्व काही आलबेल असल्याचा दक्षता पथकाचा दावा फोल ठरला आहे.