शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

"आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अन् उत्तम कामगिरी करून दाखवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:26 AM

मुख्यमंत्री चन्नी यांचे सिद्धू यांना आव्हान

अमृतसर : पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग यांच्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याशीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे पटेनासे झाले आहे. मी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास तयार आहे. आता तुम्ही मुख्यमंत्री व्हा व दोन महिन्यांत उत्तम कामगिरी करून दाखवा, असे आव्हान चन्नी यांनी सिद्धू यांना मंगळवारी झालेल्या भेटीत दिल्याचे समजते.काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आखून दिलेल्या १३ कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी अजून का पूर्ण नाही, असा सवाल सिद्धू यांनी विचारला असता, त्यावर चन्नी यांनी हे उत्तर दिल्याचे कळते. चन्नी व सिद्धू यांच्यातील मतभेद तीव्र झाल्याने पंजाब काँग्रेसमधील दुफळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॅ. अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्यानंतर काँग्रेस पक्षातील नेते एकजुटीने पुढील वर्षी होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी कामाला लागतील, असे वाटत होते; मात्र या पक्षातील कुरबुरी कमी होण्याऐवजी वाढीला लागल्या आहेत. नवज्योतसिंह सिद्धू यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र रविवारी सर्वांसाठी खुले केले होते. या पत्रात सिद्धू यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत करण्याची शेवटची संधी आपल्या हातात आहे. पंजाबकरिता मी १३ कलमी कार्यक्रम तयार केला असून, तो तुम्ही लक्षपूर्वक पाहावा, अशी माझी विनंती आहे. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगcongressकाँग्रेस