Chandrayaan-2 : विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 09:32 AM2019-09-07T09:32:16+5:302019-09-07T09:41:37+5:30

अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान आहे.

Chandrayaan-2 : There is no failure in science, only experiment and efforts - PM Narendra Modi | Chandrayaan-2 : विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदी

Chandrayaan-2 : विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदी

googlenewsNext
ठळक मुद्देअंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान आहे. चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता.विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

बंगळुरू - आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे. अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान आहे. चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो. चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता. विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका.  देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित केलं. यावेळी चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली. तसेच  देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत मोदींनी रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. 

इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. अडचणींमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही. लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही. आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

भारतीय चांद्रयान-2 चे विक्रम हे लँडर शनिवारी (7 सप्टेंबर) पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात होते. मात्र याच दरम्यान ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला.इस्रो लँडर उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, संपर्क तुटल्यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांचे चेहरे पडले, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या... त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने देशाला पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. 

होप फॉर द बेस्ट... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे एक वाक्य इस्रोतील वैज्ञानिकांना आणि 130 कोटी भारतीयांना नवी ऊर्जा देणारं ठरलंय. चांद्रयान 2 मोहिमेतील शेवटचा टप्पा असलेल्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली होती. त्यावेळी, देशाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि देशवासियांचे मनोधैर्य वाढवले. चंद्रापासून केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं. 

होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे. तुम्ही देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असे मोदींनी म्हटले. मोदींचे एक मिनिटांचे ते भाषण देशावासियांना नवी ऊर्जा देऊन गेलंय. त्यानंतर, मोदींनी ट्विट करुनही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. हा क्षण अतिशय धाडसाचा आणि धैर्याचा आहे. आपण ते धैर्य ठेऊच,  इस्रोचे चेअरमन चांद्रयान 2 मोहिमेबद्दल माहिती देत असून आपण मोहिमेच्या चांगल्या पहाटेची आशा ठेऊया, असे ट्विट मोदींनी केलं आहे. 

Web Title: Chandrayaan-2 : There is no failure in science, only experiment and efforts - PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.