शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

Chandrayaan-2: 'जय किसान, जय विज्ञान'... चांद्रयान-२ मोहिमेत शेतकरी पुत्राची मोलाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 3:59 PM

चंद्रकांता इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे चांद्रयान-2 मोहिमेची जबाबदारी आहे. 

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 चे प्रक्षेपण सोमवारी यशस्वी झाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने यशस्वी झेपावले. त्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि आनंद साजरा केला. दरम्यान, या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये पश्चिम बंगालमधील  शिबपूर गावातील मधुसूदन कुमार या शेतकऱ्याचा एक मुलगा आहे. चंद्रकांता असे या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. चंद्रकांता इस्त्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे चांद्रयान-2 मोहिमेची जबाबदारी आहे. 

मधुसूदन कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, 'ज्यावेळी मिशन स्थगित करण्यात आले, त्यावेळी आम्ही दु:खी होतो. मात्र, आम्ही भारताच्या सर्वात कठीण चंद्र मिशनच्या लाँचिगसाठी तयार आहोत. आम्हाला खूप अभिमान आहे की, आमचा मुलगा त्या टीमचा एक हिस्सा आहे.' याचबरोबर, शेतातील कामात व्यस्त असल्यामुळे मला चंद्रकांता यांच्याकडे शिक्षणासाठी वेळ द्यायला मिळाला नाही. चंद्रकांता यांना त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांता नेहमी मेहनत करत होते. 2001 मध्ये इस्त्रोमध्ये रुजू झाले. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर त्यांना महत्वपूर्ण अशा मिशनचे प्रमुख बनविण्यात आले, असे चंद्रकांता यांचे वडील मधुसूदन कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, चंद्रकांता यांचे लहान भाऊ सुद्धा शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे नाव चंद्रावरुन शशिकांत ठेवले आहे. तर, चंद्रकांता यांचे नाव त्यांचे कुटुंबीय सूर्यकांत असे ठेवणार होते. मात्र, शाळेतील शिक्षकांनी त्यांना चंद्रकात ठेवायला सांगितले. 

चंद्रकांता यांच्याकडील इस्त्रोची जबाबदारीचंद्रकांता यांनी भारतीय उपग्रह आणि ग्राऊंड स्टेशनांसाठी एंटिना स्टिस्टम डिझाईन केली आहे. त्यांनी चांद्रयान -1, GSAT-12 आणि ASTROSAT साठी प्रोजेक्ट मॅनेजर, एंटिना सिस्टमसाठी काम केले. सध्या ते त्याठिकाणी डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चांद्रयान-2 ची आरएफ सिस्टमची जबाबदारी आहे. यूआर राव सॅटेलाईट सेंटरचे 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स' विभागाचे प्रमुख आहेत.

'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून 'बाहुबली' रॉकेटच्या मदतीने चांद्रयान-2 यानाने  दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक आले होते. ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

 

पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार चक्करमध्ये बदल, एपोजीमध्ये 60.4 किमीचे अंतर22 जुलै : ‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणानंतर पृथ्वीच्या चारी बाजूने अंडाकार कक्षात घिरट्या घालेल. याचा पेरिजी (पृथ्वीपासून कमी अंतर) 170 किमी आणि एपोजी (पृथ्वीपासून जास्त अंतर) 39120 किमी असणार आहे. 15 जुलै : ‘चांद्रयान-2’ जर लाँच झाले असते तर याचा पेरिजी 170.06 किमी आणि एपोजी 39059.60 किमी होणार होता. म्हणजेच एपोजीमध्ये 60.4 किमी अंतर आणले असते. तसेच, पृथ्वीच्या चारी बाजूने घालणाऱ्या घिरट्या कमी केल्या असत्या. 

चंद्रावर पोहोचण्याच्या कालावधीत 6 दिवसांनी कमी  ‘चांद्रयान-2’ जर 15 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले झाले असते तर 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले असते. मात्र. आज 22 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर ‘चांद्रयान-2’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी 48 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच, ‘चांद्रयान-2’ हे 6 सप्टेंबरलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. ‘चांद्रयान-2’ आता पृथ्वीच्या चारी बाजूने 5 च्याऐवजी 4 घिरट्या घालणार आहे. 

वेलोसिटीमध्ये 1.12 मीटर प्रति सेकंद वाढ‘चांद्रयान-2’ चे आज प्रक्षेपण झाल्यानंतर चंद्रावर जास्त वेगात जाणार आहे. आता अंतराळात याचा वेग 10305.78  मीटर प्रति सेंकद असणार आहे. जर, 15 जुलैला प्रक्षेपण झाले असते तर याचा वेग 10,304.66 मीटर प्रति सेकंद असता. म्हणजेच, आज होणाऱ्या प्रक्षेपणात ‘चांद्रयान-2’ चा वेग 1.12 मीटर प्रति सेकंद वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो