Chandigarh MCC Results: आपचे बहुमत तरी चंदीगढ महानगरपालिकेत भाजपाचा महापौर, उपमहापौर; पुन्हा एका मताने जिंकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:04 IST2023-01-17T16:02:54+5:302023-01-17T16:04:12+5:30
गेल्या वर्षीही भाजपने केवळ एका मताने आपचा पराभव करत चंदीगढ महापालिकेचे महापौरपद मिळविले होते. दोन्ही पक्षांना 14-14 मते मिळाली होती.

Chandigarh MCC Results: आपचे बहुमत तरी चंदीगढ महानगरपालिकेत भाजपाचा महापौर, उपमहापौर; पुन्हा एका मताने जिंकला
केंद्र शासित प्रदेश चंदीगढ महानगरपालिकेत महापौर पदावर भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. अनुप गुप्ता महापौर बनले आहेत. आम आदमी पक्षाचे बहुमत असलेली महापालिका आता भाजपने काबीज केली आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीसाठी महापौरपदासाठी एकूण 29 मतदान झाले होते. भाजपचे अनुप गुप्ता यांना 15 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे जसबीर यांना 14 मते मिळाली. ही निवडणूक भाजपने 1 मतांच्या फरकाने जिंकली आहे.
तर उपमहापौरपदी भाजपचे कंवरजीत सिंग यांची निवड झाली आहे. कंवरजीत सिंह यांनी आपच्या तरुणा मेहता यांचा पराभव केला. काँग्रेस आणि अकाली दलाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यामुळे भाजपाचा विजय सुकर झाला.
गेल्या वर्षीही भाजपने केवळ एका मताने आपचा पराभव करत चंदीगढ महापालिकेचे महापौरपद मिळविले होते. दोन्ही पक्षांना 14-14 मते मिळाली होती. आप उमेदवार अंजू कात्याल यांचे मत अवैध ठरल्याने सरबजीत कौर महापौर झाल्या होत्या. यंदाही दोन्ही पक्षांची १४-१४ मते होती. तर काँग्रेस सहा आणि शिरोमणी अकाली दलाचे एक मत होते. परंतू काँग्रेस आणि अकाली दलाने बहिष्कार टाकल्याने यंदाही निवडणूक चुरशीची झाली होती. भाजप खासदार किरण खेर यांनाही महापालिकेच्या सभागृहाचे पदसिद्ध सदस्यअसल्याने मतदानाचा अधिकार आहे. यामुळे त्यांचे मत निर्णायक ठरले.