शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:56 IST2025-07-30T12:55:31+5:302025-07-30T12:56:56+5:30
Jharkhand News: दोन वर्षांपूर्वी ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवरून जाणाऱ्यांवर वीज पडली होती. महाराष्ट्रातील फलटणमध्ये हा प्रकार घडला होता. आता मोबाईल वापरणाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्...
झारखंडमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. पाकुड जिल्ह्याच्या लिट्टीपाडा भागात पावसात मोबाईल वापरणाऱ्याच्या शेजारी वीज पडली आहे. यामुळे त्याचा मोबाईलचा स्फोट झाला आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे पावसात मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दोन वर्षांपूर्वी ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवरून जाणाऱ्यांवर वीज पडली होती. महाराष्ट्रातील फलटणमध्ये हा प्रकार घडला होता. आता मोबाईल वापरणाऱ्याचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या बडाघघऱी गावातील चंदन मडैयासोबत हा प्रकार घडला आहे. तर त्याचा भाऊ निर्मल मडैया गंभीर जमखी झाला आहे.
या दोघांवर वीज पडली नव्हती. अचानक वीज पडतानाचा मोठा आवाज झाला आणि त्यानंतर चंदनच्या हातातील मोबाईलचा स्फोट झाला व तो खाली कोसळला. दोघेही शेतामध्ये टॉयलेटला गेले होते. यावेळी चंदन त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत होता. मोबाईल फुटल्याने तो त्याच अवस्थेत जमिनीवर कोसळला. तर निर्मल थोडा जवळच होता, तो देखील जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला.
आजुबाजुच्या लोकांना याची माहिती मिळताच ते मदतीला धावले. दोघांनाही जखमी अवस्थेत आरोग्य केंद्रात नेले गेले, तिथे निर्मलला पाकुडच्या हॉस्पिटलला पाठविण्यात आले तर चंदनला मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. माहिती मिळताच पोलिस देखील आरोग्य केंद्रात दाधल झाले होते.