शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

कोरोनाची लस घेतल्यानंतर फक्त 0.06% लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले - स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 3:13 PM

vaccination : कोरोना लसीवरील (Corona Vaccine)नुकत्याच केलेल्या स्टडीमध्ये असेही समोर आले आहे की, लसीकरण करण्यात आलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहिले आहेत.

ठळक मुद्देशनिवारी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने लस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या लोकांवर केलेल्या स्टडीचा निकाल समोर आला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेमुळे (Second Wave) हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी भयानक आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस (Vaccine) हे सर्वात मोठे शस्त्र म्हणून पाहिले जात आहे. कोरोना लसीवरील (Corona Vaccine)नुकत्याच केलेल्या स्टडीमध्ये असेही समोर आले आहे की, लसीकरण करण्यात आलेले 97.38 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहिले आहेत. तसेच, जे लोक संक्रमित झाले आहेत, त्यापैकी केवळ 0.06 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. (chances of hospitalisation after covid vaccination are 0.06 percent, says Indraprashta Apollo Hospital study)

शनिवारी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने लस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या लोकांवर केलेल्या स्टडीचा निकाल समोर आला आहे. या स्टडीमध्ये असे म्हटले आहे की, कोरोना लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संक्रमणाची शक्यता खूपच कमी होती आणि ज्यांना संसर्ग झाला त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले गेले नाही किंवा त्यांचा मृत्यू झाला नाही. नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने ही स्टडी अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर केली आहे की, ज्यांना कोव्हिशिल्ड लस देण्याआधी 100 दिवसांत कोविडची लक्षणे आढळली.

"भारतात लसीकरण मोहिमेदरम्यान कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लसीकरणानंतरही काही लोकांना संसर्ग होत आहे. ज्याला ब्रेकथ्रू संक्रमण असे म्हणतात. हे संक्रमण काही व्यक्तींमध्ये अंशतः आणि संपूर्ण लसीकरणानंतर उद्भवू शकते", असे अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ अनुपम सिब्बल यांनी वृत्तसंस्था 'एएनआय'ला सांगितले.

ही स्टडी 3235 आरोग्य कर्मचार्‍यांवर करण्यात आली. स्टडीनुसार असे आढळले आहे की, यापैकी 85 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 65 कर्मचार्‍यांना (2.62%) लसीचे दोन्ही डोस दिले गेले, तर 20 (2.65%) लोकांला लसीचा फक्त एकच डोस मिळाला. यादरम्यान, महिलांवर व्हायरसचा जास्त परिणाम दिसून आला. विशेष म्हणजे, वृद्ध किंवा लहान वयातील संसर्गावर कोणताही फरक पडला नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या