शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 19:44 IST

CoronaVaccine: भारतातही कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. भारतीय कंपन्यांची दोन व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यामध्ये आली आहेत. गरज आणि लोकसंख्येमुळे भारत दरवर्षी 3 अब्ज व्हॅक्सीन तयार करतो. यापैकी 2 अब्ज लसींची निर्यात केली जाते. हा उत्पादनाचा आकडा एवढा प्रचंड आहे की जगातील दर तीन व्हॅक्सिनमागे एक लस ही भारतीय आहे. 

जगभरातील लोक कोरोनावर लस शोधण्याच्या मागे लागले आहेत. आधी शस्त्रास्त्र स्पर्धा होती. आता लस शोधण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे कोरोनाचा जन्मदाता चीन कोरोना लस शोधल्याचे दावे करत आहे. तर अमेरिका, रशिया, ब्रिटनच नाही तर इवलासा मलेशियाही कोरोना लस शोधण्याच्या कामी लागला आहे. यामुळे कोण पहिली लस शोधतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या देशांचे स्वप्न भारताशिवाय प्रत्यक्षात येणार नाहीय. 

वैद्यकीय तज्ज्ञांनुसार कोरोनाला जर हरवायचे असेल तर ही व्हॅक्सिन संपूर्ण जगासाठी आणि कमी किंमतीत उपलब्ध करावी लागणार आहे. आणि हे भारताशिवाय शक्य नाहीय. कारण भारतात जेवढ्या लस बनविल्या जातात तेवढ्या लस अख्ख्या जगात बनविल्या जात नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना लस तयार करायची ताकद फक्त भारताकडेच आहे. 

भारतातही कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. भारतीय कंपन्यांची दोन व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यामध्ये आली आहेत. गरज आणि लोकसंख्येमुळे भारत दरवर्षी 3 अब्ज व्हॅक्सीन तयार करतो. यापैकी 2 अब्ज लसींची निर्यात केली जाते. हा उत्पादनाचा आकडा एवढा प्रचंड आहे की जगातील दर तीन व्हॅक्सिनमागे एक लस ही भारतीय आहे. 

कोरोनावर जगभरात 11 व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. काही मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. यात भारताच्या दोन आहेत. यामध्ये COVAXIN आणि ZyCov-D आहेत. भारत बायोटेक (Bharat Biotech) ची COVAXIN ची मानवी चाचणी सुरु झाली आहे. 375 रुग्णांवर याची चाचणी केली जात आहे. तर झायडस कॅडिला (Zydus Cadila) ZyCov-D चीही मानवी चाचणी सुरु आहे. या लसीची 1000 हून अधिक लोकांवर चाचणी सुरु आहे. तिसरी ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस असून तिची परदेशात चाचणी सुरु आहे. मात्र, पुण्यात उत्पादन सुरु झाले आहे. याशिवाय भारताच्या सहा फार्मास्युटिकल कंपन्या ग्लोबल इंस्टिट्यूटसोबत मिळून वेगवेगळ्या स्तरावर कोरोना लसीच्या संशोधनासाठी काम करत आहेत. भविष्यात या कंपन्यांची कोरोना लसही लढाईमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावणार आहेत. 

काय आहे कारण? भारतात लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. मास प्रॉडक्शनमुळे या लसी दुसऱ्या देशांच्या तुलनेत स्वस्तही असतात. पुण्याची सीरम इंस्टिट्यूट जगातील सर्वात जास्त लसी तयार करते. दरवर्षी ही कंपनी 1.5 अब्ज डोस तयार करते. यामुळे जगाला कोरोनाची व्हॅक्सिन मिळण्यासाठी भारताशिवाय पर्याय राहणार नाही. भले कोणत्याही कंपनीने, कोणत्याही देशाने कोरोनाची लस शोधली तरीही त्यांना ती लस मेड इन इंडियाच करावी लागणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये मोठे बदल; करदात्यांनो जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे

Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या