शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

केंद्राचे शपथपत्र; लसीकरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये, तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM

केंद्राच्या वतीने कोर्टात २१८ पानांचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यात सरकारने कोरोना संकटाशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, धोरण तसेच लसीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

 नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन ऑक्सिजन तसेच इतर महत्त्वाच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये हस्तक्षेप केला होता. मात्र, न्यायालयाने लसीकरणात हस्तक्षेप करू नये. लसीकरणाची योजना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आखण्यात आली आहे. न्यायालयीन हस्तक्षेपामुळे अनपेक्षित गोंधळ उडू शकतो, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे याप्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार, दि. १३ मे रोजी ठेवण्यात आली आहे.केंद्राच्या वतीने कोर्टात २१८ पानांचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यात सरकारने कोरोना संकटाशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, धोरण तसेच लसीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, या जागतिक महामारीचा सामना करताना सरकारचे धोरण आणि रणनीती ही वैद्यकीय आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार आखली आहे. न्यायालयीन हस्तक्षेपामुळे आमच्या प्रयत्नांना धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे न्यायालयाने तो टाळावा असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्राने ‘सिरम इन्स्टिट्यूट’ आणि भारत बायोटेकला आर्थ‍िक मदत केलेली नसून लसींसाठी आगाऊ मोबदला दिला आहे. केवळ चाचण्यांदरम्यान काही प्रमाणात आर्थ‍िक मदत केली होती, असेही केंद्राने म्हटले आहे. ऑनलाइन नोंदणी योग्य, दारोदारी शक्य नाहीकेंद्राने लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीचे समर्थन केले आहे. यामुळे ही प्रक्रिया सुलभ होणार असून, सरकारला लाभार्थींना ट्रॅक करणे शक्य आहे. लसींचे डोस अमर्याद नाहीत. त्यामुळे वॉक-इन परवानगी दिल्यास लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ शकते, असे केंद्राने म्हटले आहे. ग्रामीण भागात पंचायतींच्या माध्यमातून सेवा केंद्र उपलब्ध करून दिली आहे. गोरगरीब जनता किंवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, अशा नागरिकांनी मित्रमंडळी, कुटुंबातील इतर सदस्य किंवा स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊ शकतात, असेही केंद्राने म्हटले आहे. दारोदारी जाऊन लसीकरण शक्य नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.रुग्णालयांची थ्री-टीयर यंत्रणाकोरोना रुग्णांना हाताळण्यासाठी थ्री-टीयर यंत्रणा उभारली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण देशातील कुठल्याही कोविड आरोग्य केंद्रात दाखल होऊ शकतो. तसेच या ठिकाणी दाखल होण्यासाठी काेरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्टचीही गरज नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, काही राज्यांमध्ये दाखल होण्यासाठी किंवा सरकारी रुग्णवाहिकेसाठी जिल्हा प्रशासनाकडून शिफारस बंधनकारक कशासाठी केली आहे, याबाबत शपथपत्रात खुलासा करण्यात आलेला नाही. वैद्यकीय कर्मचारी संख्या वाढवलीराज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी यापूर्वीच सूचना करण्यात आल्याची माहिती केंद्राने दिली आहे. ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना ड्युटीमध्ये सामावून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. १०० दिवस कोरोना ड्युटी पूर्ण करणाऱ्यांना योग्य मोबदलाही देण्यात येणार आहे, असेही शपथपत्रात म्हटले आहे.

लस समान दरांत विकण्याच्या सूचना- किमतींबाबत सांगितले, की राज्यांना समान दरांत लस विकण्यासउत्पादकांना सांगण्यात आले आहे. - केंद्राने मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली तसेच आगाऊ रक्कमही कंपन्यांना दिली. खासगी रुग्णालयांत पैसे देऊन लसीकरणाचाही पर्याय जनतेसाठी खुला आहे. - खासगी क्षेत्रातून २५ टक्के लसीकरण झाल्यास गती वाढून सरकारी यंत्रणेवर ताणही कमी होईल.

विविध वयोगटांनुसार टप्पे इतर देशांप्रमाणेचलसींच्या विविध टप्प्यांबाबत केंद्राने म्हटले आहे, की जगभरात लसींची मर्यादित उपलब्धता आहे. जगभरात लसींसाठी विविध वयोगटानुसार प्राथमिकता निश्चित करण्यात आली. भारतानेही याच धोरणाचा अवलंब केला. देशात पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी लसींच्या आयातीलाही परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय