शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाला केंद्राकडून 33.69 कोटी येणे; PMOने थकवले ७.१९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 07:45 IST

माहिती अधिकार अर्जाच्या प्रतिसादात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे एअर इंडियाची एकूण थकबाकी ३३.६९ कोटी इतकी आहे.  

मुंबई : अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिलेल्या विमानसेवेपोटी केंद्र सरकारकडून एअर इंडियाला अद्याप ३३.६९ कोटींचे येणे बाकी असल्याची बाब समोर आली आहे.माहिती अधिकार अर्जाच्या प्रतिसादात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे एअर इंडियाची एकूण थकबाकी ३३.६९ कोटी इतकी आहे.  त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या विमानसेवेचा खर्च ७.१९, राष्ट्रपतींच्या उड्डाणांची रक्कम ६.१२ कोटी आणि उपराष्ट्रपतींच्या उड्डाणांची थकबाकी १०.२१ कोटी रुपये आहे. निवृत्त कमोडोर लोकेश बत्रा यांनी उपरोक्त माहिती ‘आरटीआय’अंतर्गत मागविली. राष्ट्रपतींची उड्डाणे संरक्षण मंत्रालय हाताळते. ५ ते ८ नोव्हेंबर २००८ दरम्यानच्य प्रवासासाठी राष्ट्रपती कार्यालयाकडून विमानसेवा वापरल्यानंतर ४.४५ कोटी रुपये थकीत राहिले. त्यावेळी प्रतिभा पाटील या पदावर होत्या.पंतप्रधान कार्यालयाची ४.२५ कोटी थकबाकीपंतप्रधान कार्यालयातील कॅबिनेट सचिव पंतप्रधानांच्या विमान प्रवासाची जबाबदारी सांभाळतात. ११ मार्च २०२० ते १५ मार्च २०२० दरम्यानच्या प्रवासासाठी एअर इंडियाची सेवा वापरण्यात आली. त्याची थकबाकी ४.२५ कोटी रुपये होती. ही एकल प्रवासातील सर्वाधिक थकीत रक्कम आहे. उपराष्ट्रपती, परदेशी मान्यवर, निर्वासितांसाठी आवश्यक असलेली विमानसेवा परराष्ट्र मंत्रालय उपलब्ध करून देते. १४ ते २० ऑक्टोबर २०१६ दरम्यान उपराष्ट्रपती कार्यालयाकडून सर्वात मोठी थकबाकीची रक्कम ५.९५ कोटी रुपये होती. त्यावेळी हमीद अन्सारी या पदावर होते. निर्वासित आणि परदेशी मान्यवरांसाठी आरक्षित केलेल्या विमानसेवेपोटी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून एअर इंडियाला अनुक्रमे ७.२१ कोटी आणि २.९४  कोटी रुपये येणे आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाNarendra Modiनरेंद्र मोदी