Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:32 PM2021-06-13T12:32:58+5:302021-06-13T12:33:27+5:30

कोरोना महामारीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सातत्यानं केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

centre has the Most efficient ministry to raise lies and wasteful slogans taunts rahul gandhi | Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi: 'केंद्राकडे धादांत खोटं आणि फालतू घोषणा देणारं सर्वात कुशल मंत्रालय', राहुल गांधींचा घणाघात

Next

कोरोना महामारीच्या नियोजनाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सातत्यानं केंद्रावर हल्ला चढवत आहे. कोरोना लसीच्या कमतरतेपासून रुग्णालयात रुग्णांना बेड न मिळण्यापासून अनेक गोष्टींवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी ट्विटर हँडलवरुन सातत्यानं मोदी सरकारवर टिकास्त्र सोडताना दिसत आहेत. राहुल यांनी यावेळी नेटिझन्सलाच प्रश्न विचारुन त्याचं उत्तर देखील स्वत:च देऊन टाकलं आहे. "केंद्र सरकारमधील सर्वात कुशल मंत्रालय कोणतं?", असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आणि त्याच्या उत्तरात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा करणारं गुप्त मंत्रालय हे केंद्राचं सर्वात कुशल मंत्रालय आहे", असा खोचक टोला राहुल यांनी लगावला आहे. 

कोरोना मृत्यूंचे आकडे लपविल्याचा केला आरोप
राहुल गांधी यांनी याआधी केंद्र सरकारवर देशातील कोरोना मृत्यूंचे आकडे लपविल्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय देशातील प्रत्येक नागरिकानं आता मोफत लस मिळविण्याच्या मागणीसाठी पुढे यायला हवं असं म्हटलं होतं. देशातील प्रत्येक नागरिकाला लस देणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. "कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन महत्वाचं नाही. लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: centre has the Most efficient ministry to raise lies and wasteful slogans taunts rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app