शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Corona Vaccination : 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घ्यावी लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 5:43 PM

Corona Vaccination : केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देदेशात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चिंताजनक परिस्थितीत हा आदेश आला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे. कार्मिक मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, लसीकरणानंतरही कोव्हिड -19 पासून वाचण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाळण्याची सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे, ज्यात वारंवार हात धुणे, स्वच्छता, मास्क किंवा फेस कव्हर घालणे आणि सामाजिक अंतर इत्यादींचा समावेश आहे. (centre ask central govt employees of 45 years and above for corona vaccination)

आदेशात म्हटले आहे की, कोव्हिड -19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लसीकरणासाठी समूहांना प्राधान्य देण्याच्या धोरणावर आधारित 45 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्ती लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या सर्व विभाग आणि मंत्रालयांना दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, “वरील बाबी लक्षात घेता 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण करण्याचे सूचविले आहे." दरम्यान, देशात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चिंताजनक परिस्थितीत हा आदेश आला आहे.

(Corona Vaccination : "१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी द्या", IMA चे नरेंद्र मोदींना पत्र)

दरम्यान,  कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 

गेल्या 24 तासांत तब्बल 96,982 नवे रुग्णगेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,26,86,049 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी