शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भारत-चीन तणाव : लडाखमध्ये अशी आहे भारताची तयारी; जवानांनी बनवला VIDEO, ड्रॅगनला प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 2:59 PM

व्हिडिओमध्ये लडाखमध्ये टँकपासून ते पायदळ सैन्याची कशी तयारी आहे, हेही दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जवानांसाठीही कोणतेही लक्ष अवघड नाही. खरेतर हा व्हिडिओ शत्रूसाठी इशारा आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लद्दाखमधील भारतीय जवानांचा व्हिडिओ ट्विट केला आहे.या व्हिडिओमध्ये भारताच्या भू-दल, नौ-दल आणि हवाई-दलाची तयारी दिसत आहे. भारताचा हा व्हिडिओ म्हणजे चीनला दिलेले चोख उत्तर मानले जात आहे.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसोबत तणाव सुरू असतानाच भारतीय लष्कर पूर्णपणे सतर्क आणि तयार आहे. चीन गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील आपल्या सैनिकांच्या तयारीचा व्हिडिओ जारी करत आहे. अशातच आता, केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लद्दाखमधील भारतीय जवानांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. ध्रुव वॉरियर्स नावाच्या या व्हिडिओमध्ये भारताची संपूर्ण तयारी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या भू-दल, नौ-दल आणि हवाई-दलाची तयारी दिसत आहे. भारताचा हा व्हिडिओ म्हणजे चीनला दिलेले चोख उत्तर मानले जात आहे.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

व्हिडिओमध्ये भारतीय जवानांची तयारी -

केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर जारी केलेल्या या 2 मिनिट 4 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये भारतीय जवानांची आकाशापासून जमिनिवरीची तयारी आणि प्रशिक्षण दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर रात्रीही अत्यंत दुर्गम भागांत भारतीय जवान कशा प्रकारे काम करतात हेही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

टँक ते पायदळ, भारताची जबरदस्त तयारी -व्हिडिओमध्ये लडाखमध्ये टँकपासून ते पायदळ सैन्याची कशी तयारी आहे, हेही दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जवानांसाठीही कोणतेही लक्ष अवघड नाही. खरेतर हा व्हिडिओ शत्रूसाठी इशारा आहे.

कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी तयार -व्हिडिओमध्ये जवानांचे युद्धासंदर्भातील सर्वप्रकारचे प्रशिक्षण दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये जवान  हेलिकॉप्टरमधून उड्या घेतानाही दाखवण्यात आले आहेत.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

हा व्हिडिओ म्हणजे चीनला प्रत्युत्तर -हा व्हिडिओ म्हणजे चीनला प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी सरकारी वृत्तपत्र ग्‍लोबल टाइम्‍सने चीनी सैन्याचा टँकसह सुरू असलेल्या युद्धाभ्‍यासाचा व्हिडिओ जारी केला होता. पीएलएच्या या व्हिडिओमध्ये चीनी सैनिक आपल्या टँकसह एका पहाडावर युद्धसराव करत होते. 

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवान