रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:20 IST2025-02-20T15:19:18+5:302025-02-20T15:20:32+5:30
इंडियाज गॉट लेटेंट शो वादग्रस्त ठरल्यानंतर केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्संना नोटीस पाठवली आहे.

रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा
रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानानंतर इंडियाज गॉट लेटेंट शो वादाचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे युट्यूब, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कॉन्टेटवरून वादविवाद सुरू झाला आहे. यासंदर्भात आता केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्संना नोटीस पाठवली असून, आयटी नियमांचं पालन करण्याचा इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयटी नियम २०२१ नुसार आचार संहितेचं पालन करण्यात यावं आणि सेल्फ रेग्युलेशनवर लक्ष देण्याबरोबरच अ ग्रेडचा कॉन्टेट मुलांनी बघू नये म्हणून अॅक्सेस कंट्रोल लागू करण्यात यावा, असेही केंद्राने निर्देश केंद्राने दिले आहेत.
केंद्र सरकारच्या नोटीसमध्ये आणखी काय?
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्संनी असा कोणताही मजकूर दाखवू नये जो प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. जो कॉन्टेट आहे, त्याचे वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात यावे. नियमांनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म्संनी आचार संहितेचं पालन होईल यासाठी स्वतःच्या समित्यांनी काळजी घेतली पाहिजे.
प्लॅटफॉर्म्संवर कॉन्टेट प्रदर्शित करण्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तयार करण्यात आलेल्या आचार संहितेतीतल नियमांचं उल्लंघन होणार नाही, हे बघायला हवे, असेही सरकारने म्हटले आहे.