केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 10:57 AM2020-07-28T10:57:02+5:302020-07-28T10:57:50+5:30

केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे

Central Government Released Rs 1.65 Lakh Crore As GST Compensation To States In FY20 | केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

Next

नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून जीएसटी परतावा देण्यावरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद निर्माण झाला होता, केंद्रात भाजपाचं सरकार असल्यामुळे या मुद्द्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी विरोधी पक्ष भाजपाची कोंडी करत होतं, मात्र आता केंद्र सरकारने मार्च २०२० साठी राज्यांचा जीएसटी परतावा दिला आहे. त्यात सर्वाधित जीएसटी परतावा रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला १९ हजार २३३ कोटी सर्वाधिक रक्कम दिली आहे, त्यानंतर कर्नाटकला १८ हजार ६२८ कोटी रुपये जीएसटी परतावा म्हणून मिळाले आहेत.

केंद्राकडून जीएसटी परतावा देण्यात आलेली राज्ये

आंध्र प्रदेश – ३ हजार २८ कोटी

आसाम – १ हजार २८४ कोटी

बिहार – ५ हजार ४६४ कोटी

छत्तीसगड – ४ हजार ५२१ कोटी

दिल्ली- ८ हजार ४२४ कोटी

गोवा – १ हजार ९३ कोटी

गुजरात – १४ हजार ८०१ कोटी

हरयाणा – ६ हजार ६१७ कोटी

हिमाचल प्रदेश – २ हजार ४७७ कोटी

जम्मू काश्मीर – ३ हजार २८१ कोटी

झारखंड – २ हजार २१९ कोटी

कर्नाटक – १८ हजार ६२८ कोटी

केरळ – ८ हजार १११ कोटी

मध्य प्रदेश – ६ हजार ५३८ कोटी

महाराष्ट्र – १९ हजार २३३ कोटी

मेघालय – १५७ कोटी

ओडिशा – ५ हजार १२२ कोटी

पौंडेचेरी – १ हजार ५७ कोटी

पंजाब – १२ हजार १८७ कोटी

राजस्थान – ६ हजार ७१० कोटी

तामिळनाडू – १२ हजार ३०५ कोटी

तेलंगणा – ३ हजार ५४ कोटी

त्रिपूरा – २९३ कोटी

उत्तर प्रदेश – ९ हजार १२३ कोटी

उत्तराखंड – ३ हजार ३७५ कोटी

पश्चिम बंगाल – ६ हजार २०० कोटी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी होत होती, अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिलं होतं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता, त्यामुळे जीएसटी परताव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला केंद्राकडून १९ हजार २३३ कोटी इतकी भरघोस रक्कम मिळाली आहे.  

Web Title: Central Government Released Rs 1.65 Lakh Crore As GST Compensation To States In FY20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.