शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात ‘उडान’, नवीन १०० विमानतळांसह २०० हेलिपॅड उभारणार, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 07:24 IST

देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या उडान योजनेच्या सुधारित स्वरूपास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या उडान योजनेच्या सुधारित स्वरूपास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यानुसार २०२६-२७ ते २०३५-३६ या १० वर्षांकरिता २८,८४० कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. त्यातून देशभरात वापरात नसलेल्या हवाई धावपट्ट्यांच्या ठिकाणी १०० विमानतळे विकसित केली जातील तसेच आधुनिक पद्धतीची २०० हेलिपॅड उभारली जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. 

राज्य सरकारांची मदत 

राज्य सरकारांच्या मदतीने ही १०० विमानतळे विकसित केली जातील. त्यासाठी पुढील आठ वर्षांत १२,१५९ कोटी रुपये खर्च होतील. तसेच प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्च करून २०० हेलिपॅड उभारण्यात येतील. 

‘आयव्हीएफआरटी’च्या कालावधीत ५ वर्षांची वाढ 

स्थलांतर, व्हिसा, विदेशी नागरिक नोंदणी आदींसाठी असलेल्या आयव्हीएफआरटी योजनेचा कालावधी ५ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय देखील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.  १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ असा या योजनेचा कालावधी असणार आहे. १८०० कोटी रुपयांचा निधीही आयव्हीएफआरटीसाठी मंजूर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

दुर्गम भागात हवाईसेवा विस्तारण्याचे लक्ष्य

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, कार्यवाही आणि देखभाल या कामांसाठी सुधारित उडान योजनेत तीन वर्षांसाठी मदत दिली जाईल. प्रत्येक विमानतळास दरवर्षी कमाल ३.०६ कोटी रुपये आणि प्रत्येक हेलिपोर्ट/वॉटर एअरोड्रोमला ९० लाख रुपयांची मदत करण्यात येईल. दुर्गम भागात हवाई सेवेचा विस्तार करण्यासाठी सुधारित उडान योजनेनुसार पवनहंससाठी दोन एचएएल ध्रुव हेलिकॉप्टर आणि अलायन्स एअरसाठी दोन एचएएल डॉर्नियर विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Udan Scheme Expansion: 100 Airports, 200 Helipads Coming Up Nationwide

Web Summary : Central government approves Udhan scheme expansion, allocating ₹28,840 crore for 100 new airports and 200 helipads by 2036. State governments will aid airport development, with financial assistance for maintenance in remote areas. IVFRT scheme extended.
टॅग्स :airplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकारAirportविमानतळ