शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय निवडणूक आयोगानं मला ब्रँड अँबेसेडर करावं- केजरीवाल

By admin | Updated: January 23, 2017 17:52 IST

केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना लाच देण्यासंदर्भातील वक्तव्यावर नोटीस बजावली होती.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना लाच देण्यासंदर्भातील वक्तव्यावर नोटीस बजावली होती. त्यासंदर्भात केजरीवालांनी निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात उत्तर दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानं मला ब्रँड अँबेसेडर करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या लिखित स्वरुपातील कॉपीची एक प्रत अरविंद केजरीवालांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केली आहे. ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या 70 वर्षांपासून निवडणुकीत खर्च होणारा अमाप पैसा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. दुस-या पक्षावाले पैसे देतील ते घ्या आणि व्होट मात्र झाडूलाच द्या, असं म्हटल्यामुळे लाचखोरी बंद होईल. हा प्रयोग केंद्रीय निवडणूक आयोगानं केल्यास येत्या दोन वर्षांत सर्व पक्ष निवडणुकीच्या काळात पैसा वाटणं बंद करतील. दिल्लीत असं घडलं असून, लोकांनी काँग्रेस आणि भाजपाकडून पैसे घेतले. मात्र आम आदमी पार्टीला मत दिलं.

(अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस)(नोटाबंदी स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा - अरविंद केजरीवाल)तत्पूर्वी गोव्यातील सभेत निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नाकारू नका, पाच हजार दिल्यास तीन पटीने अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घ्या, परंतु मतदान मात्र आम आदमी पार्टीच्या झाडूसाठीच करा,' असे आवाहन केजरीवाल यांनी साखळी येथील जाहीर सभेत केले होते. त्या वक्तव्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं नोटीस बजावत आम आदमी पार्टीची मान्यता रद्द करण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचंही म्हटलं होतं. आता निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर खुलासा करत त्यांनी ब्रँड अँबेसेडर करावं, असं म्हटलं आहे.