शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

केंद्राचा प्रचंड दबाव....जोड...

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नाशिक- नगर- मराठवाड्यास देण्याची आवश्यकता आहे.

नाशिक- नगर- मराठवाड्यास देण्याची आवश्यकता आहे.
गिरणेचे भविष्य अंधारात
पार- तापी- नर्मदा लिंकमार्फत नार- पार खोर्‍यातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमधील कच्छ- सौराष्ट्रास नेण्याचे नियोजन आहे. एनडब्ल्यूडीएने नार- पार- गिरणा घाटी लिंक प्रस्ताव तयार करून १९ टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याचे नियोजन केले होते; परंतु आता १० टीएमसी पाणी नार- पार खोर्‍यातून, तर उर्वरित २२ टीएमसी पाणी तापी खोर्‍यातून द्यावे, असे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी कळविले आहे. दमनगंगा खोर्‍यातील ५४ टीएमसी पाणी व नार-पार खोर्‍यातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमध्ये नेण्याचा डाव पद्धतशीरपणे आखण्यात आला आहे. याव्यतिरिक्त तापीतील अतिरिक्त जलसंपत्ती नर्मदेत टाकण्याचे नियोजन आहे. केंद्रामार्फत त्यासाठी महाराष्ट्रावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. महाराष्ट्राच्याच हद्दीतील पाणी महाराष्ट्राला वापरण्यासाठी बंदी येत आहे.
गोदावरी खोरे तुटीचे
वास्तविक गोदावरी खोरे तुटीचे असून त्याचे क्षेत्रफळ १४४ लाख हेक्टर इतके आहे व ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्के आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावरून नाशिक- नगर- मराठवाडा, असा संघर्ष उभा राहिला आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्यात येत आहेत. उपलब्ध असलेल्या पेलाभर पाण्यात सर्वांचे भागणार नाही व त्याचे लोटाभर पाणी कसे होईल, याचा विचार या भागातील लोकप्रतिनिधी व जलसंपदा खात्याने करणे आवश्यक आहे. गिरणा खोर्‍यातही तशीच परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत कालव्याद्वारे पाणी मिळणारे शेतकरी एकमेकांशी भांडत आहेत, तर कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यासाठी दमनगंगेचे पाणी हा एकमेव पर्याय गोदावरी खोर्‍यास तर नार- पारच्या पाण्याचा पर्याय गिरणा खोर्‍यास उपलब्ध आहे.
दमनगंगा- पिंजार व पार- तापी- नर्मदा या दोन लिंकसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव व जलतज्ज्ञांची समिती नेमावी व या समितीने दमनगंगा- नार- पार, उल्हास- वैतरणा व गोदावरी- गिरणा या खोर्‍यांचा तांत्रिक अभ्यास करून उपलब्ध पाण्याचा विनियोग कसा करावा याचे मार्गदर्शन करावे, असा आग्रह आता जाणकारांतून वाढत आहे. तसेच महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याच्या विरोधात नाशिक- नगर- मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे मोठे जनांदोलन उभारावे लागेल, असे इशारे आता देण्यात येत आहेत. भविष्यात पाण्याचा हा प्रश्न पेटल्याशिवाय राहणार नाही, असे दिसते.