शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीसाठी केंद्राची जोमात तयारी सुरू!

By admin | Updated: October 15, 2016 01:28 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी)ची अंमलबजावणी १ एप्रिल २0१७पासून सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरू केली आहे. संसदेच्या १६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीवस्तू व सेवा कर (जीएसटी)ची अंमलबजावणी १ एप्रिल २0१७पासून सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरू केली आहे. संसदेच्या १६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी कराशी संबंधित विधेयक मंजूर करवून घेण्याबाबत केंद्र सरकार सतर्क आहे. जीएसटीसाठी विविध राज्यांनी स्वतंत्र आॅनलाइन टॅक्स सर्व्हिस तसेच स्वतंत्र विभागासह त्याची पथके तयार करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. नियोजित वेळेपूर्वी ही तयारी पूर्ण होईल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केली आहे.केंद्राच्या ७ तर राज्य सरकारच्या ११ प्रकारच्या विविध करांची जागा जीएसटी घेईल. त्यात केंद्रीय अतिरिक्त अबकारी, कस्टम्सच्या विशेष अबकारी करांसह १९५५च्या एक्साईज ड्युटी कायद्यान्वये येणारा मेडिसिनल प्रीपरेशन्स, अतिरिक्त कस्टम्स ड्युटी, सेंट्रल सरचार्ज ड्युटी, सेस व सर्व्हिस टॅक्स हे केंद्र सरकारचे कर तसेच व्हॅट, विक्री कर, लक्झरी टॅक्स, प्रवेश कर, करमणूक कर, जाहिरात कर, खरेदी कर, लॉटरी व कॅसिनो आदींवरील कर, राज्याचा सरचार्ज व सेस, करांवरील अधिभार या राज्यांच्या करांचा समावेश आहे. सध्या केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारांतर्फे कर वसुली केली जाते. साहजिकच केंद्र सरकारचा सेंट्रल जीएसटी, (सीजीएसटी) राज्याचा स्टेट जीएसटी (एसजीएसटी) अशा दोन करांखेरीज एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची विक्री करणाऱ्यांसाठी इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) अशा तीन स्वतंत्र करांमधे जीएसटी वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रासह १९ राज्यांच्या विधानसभांमधे वस्तू व सेवा कर मंजूर झाला आहे. देशातल्या तमाम राज्यांत तसेच केंद्र सरकारमध्ये करवसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जीएसटी नेटवर्कसाठी प्रशिक्षण (एनएसीईएन) कस्टम्स, एक्साईज व नार्कोटिक्सच्या राष्ट्रीय अकादमीतर्फे दिले जाणार आहे. आजवर ३0७४ फिल्ड आॅफिसर्सना एनएसीईएनद्वारे प्रशिक्षण दिले आहे. देशातल्या ६0 हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अकादमीवर आहे.