शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

केंद्राने दिली राफेल किमतीची माहिती, सुप्रीम कोर्टात सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 6:50 AM

सुप्रीम कोर्टात सादर : फक्त न्यायाधीशच पाहू शकणार

नवी दिल्ली : फ्रान्सच्या दस्सॉल्ट कंपनीकडून घ्यायच्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीची माहिती देण्यास कुरकुर करणाऱ्या केंद्र सरकारने फक्त न्यायाधीशांना पाहण्यासाठी का होईना, पण ती सीलबंद लखोट्यात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली.या विमानखरेदीच्या निर्णय प्रक्रियेसह किंमतीची माहितीही द्यावी, असा आदेश न्यायालयाने ३१ आॅक्टोबर रोजी दिला, तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी किंमतीची माहिती गोपनीय असल्याने ती उघड करण्यास विरोध केला होता. परंतु सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आदेशात बदल न करता त्यांना सांगितले की, तर तसे प्रतिज्ञापत्र करा. आम्ही त्याचा विचार करू. त्यानंतर न्यायालयाचा रोष टाळण्यासाठी केंद्राने आज ती सादर केली.

राफेल विमाने खरेदीच्या निर्णय प्रक्रियेसंबंधी न्यायालयाने सांगितले होते की, त्यातील जो भाग उघड करणे योग्य आहे असे वाटते तेवढा सरकारने सादर करावा व त्याची एक प्रत याचिकाकर्त्यांनाही द्यावी. यानुसार या माहितीचा दुसरा लखोटाही न्यायालयात सादर करून ती माहिती याचिकाकर्त्यांना दिली. राफेल खरेदीसंबंधी एकूण तीन याचिका न्यायालयापुढे असून त्यावर पुढील सुनावणी बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.सरकारी माहितीतील ठळक मुद्देच्हा करार करताना आधीच्या ‘संपुआ’ सरकारच्या काळात ठरलेल्या संरक्षण सामुग्री खरेदीसंबंधीच्या प्रक्रियेचे संपूर्ण पालन केले गेले.च्सरकारने नेमलेल्या वाटाघाटी चमूने फ्रान्सशी सुमारे वर्षभर वाटाघाटी केल्या व मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीची मंजुरी घेतल्यानंतरच २३ सप्टेंबर २०१६ रोजी दोन्ही सरकारांमध्ये औपचारिक करार केला गेला.

सुरुवातीला द्यायच्या ३६ तयार राफेल विमानांखेरीज बाकीच्या विमानांचे भारतात उत्पादन करण्यासाठी फ्रेंच कंपनीने भारतातील कोणत्या कंपनीशी भागिदारी करावी, याचा उल्लेख या करारात नाही. भारतीय भागिदार दस्सॉल्ट कंपनीने निवडायचा होता. त्यांनी कोणाची निवड केली आहे आणि त्या भागिदारी कराराच्या अटी व शर्ती काय याविषयी दस्सॉल्ट कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती कळविण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय