नवी दिल्ली: देशात एप्रिलपासून होणाऱ्या जनगणना २०२६ संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाची स्पष्टता दिली. जनगणनेत नागरिकांकडून घेतलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. तुमची माहिती ना विकली जाणार, ना सरकारी योजनेसाठी वापरली जाणार, असे जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी सांगितले.
यावेळी वेगळे काय?
डेटा थेट मोबाइल अॅपमध्ये भरला जाणार, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुरक्षित, स्वयं-नोंदणीची सुविधा प्रथमच उपलब्ध, नागरिकांना पहिल्या टप्प्याच्या १५ दिवस आधी स्वतः माहिती भरण्याची संधी असेल.
डेटा सुरक्षित कसा?
डेटा सेंटर्सना 'क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर' दर्जा दिलेला असेल. ६ एन्यूमरेटरमागे एक सुपरवायझर असेल. प्रत्येक टप्प्याची दुहेरी पडताळणी केली जाईल. माहितीत कोणतीही छेडछाड शक्य नाही, असा दावा करण्यात आला आहे.
हे लक्षात ठेवा
कोणतेही कागदपत्र मागितले जाणार नाहीत. दिलेल्या माहितीवर चौकशी केली जाणार नाही. माहिती देणे स्वतःच्या जबाबदारीवर आधारित असेल.
पहिल्या टप्प्यात काय ?
जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरांची गणना होणार आहे. घराचे मालकी हक्क, किती खोल्या आहेत, घरात किती कुटुंब/विवाहित जोडपी आहेत, घराची स्थिती आणि सुविधा याबद्दलची माहिती या टप्प्यात घेतली जाणार आहे. या टप्प्यात जात, धर्म यासारखी वैयक्तिक माहिती विचारली जाणार नाही.
लिव्ह-इनमध्ये राहणारे विवाहित जोडपे मानणार
जर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे दोघे परस्परांना कायमस्वरूपी आपले मानत असतील तर जनगणनेदरम्यान त्यांना विवाहित जोडपे म्हणून गणले जावे का? भारतातील जनगणनेसाठीच्या स्वयं-गणना पोर्टलवरील वारंवार विचारल्या जाणाऱ्या (एफएक्यू) प्रश्नांतील हा एक प्रश्न आहे.
लोकसंख्या-जनगणना, घरनोंदणी आणि गृहगणनेच्या पहिल्या टप्प्यात रहिवाशांना विचारले जाणारे ३३ प्रश्न अधिसूचित करून ही यादी १६ व्या जनगणनेदरम्यान स्वयं-गणना पर्याय निवडणाऱ्यांसाठी पोर्टलवर टाकली आहे. या प्रश्नांची उत्तरे लोकांना सहजपणे देण्यासाठी पोर्टलवर एफएक्यूंची यादी प्रसिद्ध केली जाते.
Web Summary : India's 2026 census will be digital, with data secured and private. Citizens can self-register. No documents needed, information voluntary. The first phase focuses on housing details, not personal data like caste or religion.
Web Summary : भारत की 2026 की जनगणना डिजिटल होगी, डेटा सुरक्षित और निजी रहेगा। नागरिक स्वयं पंजीकरण कर सकते हैं। किसी दस्तावेज की आवश्यकता नहीं है, जानकारी स्वैच्छिक है। पहला चरण आवास विवरण पर केंद्रित है, जाति या धर्म जैसे व्यक्तिगत डेटा पर नहीं।