Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:57 IST2025-05-11T12:56:12+5:302025-05-11T12:57:37+5:30
India Pakistan ceasefire violation Updates: एकीकडे तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झालेल्या पाकिस्तानने अंधार पडताच हवाई हल्ले केले. त्यामुळे दोन्ही देशात पुन्हा तणाव वाढला आहे.

Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
Ceasefire Violation Latest Update: आधी शस्त्रसंधीसाठी तयार झालेल्या पाकिस्तानने अवघ्या काही तासांतच ती लाथाडून लावली. पाकिस्तानच्या या कृतीचा भारताने संताप व्यक्त केला. पाकिस्तानी लष्कराकडून रात्रभर हवाई हल्ले केले गेले. जे भारतीय लष्कराने हवेत हाणून पाडले. पाकिस्तानच्या या कुरघोडीमुळे सीमेवरील तणाव वाढला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्च स्तरीय बैठक बोलावली. ही बैठक मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरू आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शनिवारी रात्री सीमेवर पुन्हा तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. नवी दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या उच्च स्तरीय बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित आहे.
Visuals from Prime Minister Shri @narendramodi's meeting at 7, LKM with Defence Minister Shri @rajnathsingh, External Affairs Minister Dr. @DrSJaishankar, National Security Adviser Ajit Doval, Chief of Defence Staff and the Chiefs of all three services. pic.twitter.com/8Z2yzaodu9
— BJP (@BJP4India) May 11, 2025
शनिवारी दुपारी भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या डीजीएमओची चर्चा झाली होती. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी स्वतः कॉल करून शस्त्रसंधी करण्याबद्दल पुढाकार घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांत जमिनीवरील, हवेतील आणि समुद्र मार्गे हल्ले तात्काळ प्रभावाने थांबवण्यावर एकमत झाले होते. पण, पाकिस्तानी लष्कराने रात्रीच ही शस्त्रसंधी धुडकावून लावली.
हे विध्वंसाचं कारण होऊ बनू शकतं -ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाबद्दल म्हणाले की, मला भारत आणि पाकिस्तानच्या कणखर नेतृत्वाचा अभिमान आहे. त्यांनी वेळीच हे जाणलं की, हा संघर्ष थांबवणे गरजेचे आहे. यामुळे लाखो निष्पाप लोकांचे जीव गेले असते. हा फक्त धाडसी निर्णय नाहीये, तर दोन्ही देशांचा वारसा गौरवशाली करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध विनाशाचे कारण बनू शकले असते", असेही ते म्हणाले.