दिल्ली रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही अन् लाईव्ह फुटेज थेट पाकिस्तानच्या हातात! हेरगिरी प्रकरणात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:19 IST2026-03-24T10:19:07+5:302026-03-24T10:19:43+5:30

दिल्ली रेल्वे स्थानकावर लावलेल्या कॅमेऱ्यांचे लाईव्ह एक्सेस थेट पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

CCTV and live footage at Delhi Railway Station directly in the hands of Pakistan! Shocking revelation in espionage case | दिल्ली रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही अन् लाईव्ह फुटेज थेट पाकिस्तानच्या हातात! हेरगिरी प्रकरणात धक्कादायक खुलासा

AI Generated Image

भारतीय सुरक्षेला खिंडार पाडण्याचा पाकिस्तानचा एक मोठा कट गाझियाबाद पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली आणि हरियाणातील रेल्वे स्थानकांसह संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये आतापर्यंत २२ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, दिल्ली रेल्वे स्थानकावर लावलेल्या कॅमेऱ्यांचे लाईव्ह एक्सेस थेट पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्सकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पंक्चरच्या दुकानाचा आडोसा

या प्रकरणातील मुख्य दुवा असलेला नौशाद अली उर्फ लालू याला पोलिसांनी फरीदाबादमधून अटक केली आहे. मूळचा बिहारचा असलेला नौशाद गेल्या तीन महिन्यांपासून एका पेट्रोल पंपावर पंक्चर काढण्याचे दुकान चालवत होता. मात्र, हे दुकान केवळ एक निमित्त होते. या दुकानाच्या आडून तो रेल्वे स्थानके आणि लष्करी तळांची गुपचूप माहिती गोळा करत होता. या टोळीचा म्होरक्या सुहेल याने या संपूर्ण नेटवर्कची विण गुंफली होती.

एका फोटोसाठी ५-६ हजार रुपये

तपासात समोर आलेले सत्य अधिकच धक्कादायक आहे. हे आरोपी रेल्वे स्थानके आणि सुरक्षा दलांच्या तळांचे फोटो आणि व्हिडिओ काढून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पाकिस्तानात पाठवत होते. प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओसाठी त्यांना ४ ते ६ हजार रुपये दिले जात होते. पैशांच्या लालसेपोटी हे तरुण देशाची सुरक्षा धोक्यात घालत होते.

५० सोलर कॅमेरे लावण्याचा होता प्लॅन

या जासूसी रॅकेटचा प्लॅन अत्यंत मोठा होता. देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे ५० सोलर कॅमेरे लावण्याची त्यांची योजना होती. यातील काही कॅमेरे दिल्ली आणि सोनीपतमध्ये आधीच बसवण्यात आले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि जवानांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानात पोहोचत होते. पोलिसांनी हे कॅमेरे जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

महिला आणि अल्पवयीन मुलांचा वापर

या हेरगिरी कांडात फक्त पुरुषच नव्हे, तर महिला आणि अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. मथुरा येथील एका महिलेला आणि एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशय येऊ नये म्हणून या नेटवर्कमध्ये विविध स्तरावरील लोकांचा वापर केला जात होता. गाझियाबाद पोलीस आता या नेटवर्कची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा कसून तपास करत आहेत.

Web Title : दिल्ली रेलवे स्टेशन सीसीटीवी फुटेज सीधे पाकिस्तान के हाथ में: जासूसी मामला

Web Summary : दिल्ली रेलवे सीसीटीवी फुटेज का उपयोग कर पाकिस्तान से जुड़े जासूसी रैकेट का भंडाफोड़। पैसे के लिए संवेदनशील जानकारी, तस्वीरें, वीडियो साझा करने के आरोप में 22 गिरफ्तार। उन्होंने 50 सोलर कैमरे लगाने की योजना बनाई। नेटवर्क में महिलाएं, नाबालिग शामिल।

Web Title : Delhi Railway Station CCTV Footage Directly Accessed by Pakistan: Espionage Case

Web Summary : A Pakistan-linked espionage ring, using Delhi railway CCTV footage, was busted. 22 arrested for sharing sensitive information, photos, videos for money. They planned installing 50 solar cameras. Women, minors involved in the network.