CBSE 12th Result 2022: सीबीएसईचे १२ वीचे निकाल जाहीर; ९४.५४% विद्यार्थीनी, ९१.२५% विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:42 AM2022-07-22T10:42:26+5:302022-07-22T10:42:47+5:30

CBSE 12th Result 2022: सीबीएसईनं १२ वीचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना डिजिलॉकरमध्ये जाऊन ते पाहता येणार आहेत. पुणे विभागाचा निकाल ९०.४८ टक्के.

cbse 12th result 2022 declared pass percentage topper list website link check results | CBSE 12th Result 2022: सीबीएसईचे १२ वीचे निकाल जाहीर; ९४.५४% विद्यार्थीनी, ९१.२५% विद्यार्थी उत्तीर्ण

CBSE 12th Result 2022: सीबीएसईचे १२ वीचे निकाल जाहीर; ९४.५४% विद्यार्थीनी, ९१.२५% विद्यार्थी उत्तीर्ण

googlenewsNext

CBSE 12th Result 2022: सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून आज निकाल जाहीर करण्यात आले. यावेळीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. परीक्षेत ९४.५४ टक्के विद्यार्थीनी आणि ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी सर्वच झोनमध्ये त्रिवेंद्रम सर्वात वर राहिलं आहे.

सीबीएईकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजता दहावीच्या परीक्षांचा निकालही जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळेचा नंबर टाकून निकाल पाहता येईल. 

कसा पाहाल निकाल?

  • सर्वप्रथम सीबीएसईच्या cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर १० वी किंवा १२ वीच्या निकाल २०२२ वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळेचा क्रमांक टाका.
  • सर्व माहिती भरल्यावर सबमिटवर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

Web Title: cbse 12th result 2022 declared pass percentage topper list website link check results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.