शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

IRCTC टेंडर घोटाळ्याप्रकरणी राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 4:58 PM

रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला.

पाटना : रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. यावेळी राबडी देवी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सुद्धा सीबीआयने जवळपास चार तास चौकशी केली. रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात पहिल्यांदाच सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर आता पाटनामधील 10 सर्कुलर रोडवरील राबडी देवींच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. यावेळी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची सुद्धा चौकशी केली. ही चौकशी जवळपास चार तास चालली. यावेळी सीबीआयचे 12 हून अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक ठिकाणांवर यापूर्वीही छापेमारी करण्यात आली आहे. 

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथील हॉटेलच्या निविदावाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. लालूंसोबत पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालकांसह आणखी आठ जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रांची आणि पुरीमध्ये रेल्वे खात्याअंतर्गत येणाऱ्या हॉटेलांचा विकास आणि देखरेखीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यावेळी एका खासगी कंपनीला फायदा करून दिल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

 

टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCBIगुन्हा अन्वेषण विभाग