सेंगरसह १0 जणांवर सीबीआयकडून खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 07:17 IST2019-08-01T07:16:46+5:302019-08-01T07:17:08+5:30

सेनगर व अन्य नऊ जणांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनीही सोमवारी खुनाचा गुन्हा नोंदविला होता

CBI murder case against 40 persons with Sanger | सेंगरसह १0 जणांवर सीबीआयकडून खुनाचा गुन्हा

सेंगरसह १0 जणांवर सीबीआयकडून खुनाचा गुन्हा

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिला व तिच्या कुटुंबियांना रायबरेली येथे झालेल्या अपघातप्रकरणी भाजपचा आमदार कुलदीप सेनगर व अन्य नऊ जणांविरूद्ध सीबीआयने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सेनगर व अन्य नऊ जणांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनीही सोमवारी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. हा अपघात नसून धातपात होता. पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट होता असा आरोप विरोधकांनी केल्यामुळे या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सीबीआयकडे सोपविण्यात आला. रायबरेलीमध्ये जिथे अपघात झाला त्या घटनास्थळालाही सीबीआय अधिकारी भेट देणार आहेत. पीडित महिलेवर उपचार सुरू असलेल्या लखनऊतील रुग्णालयाचे प्रवक्ते संदीप तिवारी यांनी सांगितले की, या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. छातीला मार लागला असून, फ्रॅक्चर झाले आहे.

Web Title: CBI murder case against 40 persons with Sanger